आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालटेकडीवर आढळला हॉटेल मालकाचा मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - चपराशीपुरा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका 35 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह मालटेकडीवर शुक्रवारी रात्री आढळला. त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

चंद्रप्रकाश सुखदेवप्रसाद चौरसिया असे हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे चपराशीपुरा परिसरातच घर आणि बालाजी रेस्टॉरेंट नामक हॉटेल आहे. शुक्रवारी रात्री फ्रेजरपुरा पेालिसांना मालटेकडीवर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले असता, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या मार्गात गवतामध्ये हा मृतदेह पडून होता. चंद्रप्रकाश चौरसिया यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना कळवण्यात आले. शुक्रवारी सकाळी 11 पासून ते घरी नव्हते, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस तपास करीत आहेत. चौरसिया यांच्या डोळ्यातून रक्त निघाले होते. मात्र, ते झाडाझुडपात पडल्यामुळे निघाले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

चंद्रप्रकाश यांचा जानेवारी महिन्यात होता विवाह
चंद्रप्रकाश चौरसिया येत्या 22 जानेवारी 2014 रोजी जबलपूर येथील एका युवतीशी विवाहबद्ध होणार होते. अमरावतीतच हा विवाह सोहळा पार पडणार होता, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.