आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूनप्रकरणी पती-पत्नीला जन्मठेप, तिवसा येथे घरगुती वादातून घडली होती घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वर्षभरापूर्वी घरगुती वादातून पत्नीच्या मदतीने पंचवीस वर्षीय धाकट्या भावाचा खून केल्याप्रकरणी मोठ्या भावाला त्याच्या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

येथील जिल्हा सत्र न्यायाधीश (क्रमांक ४) एस. एम. भोसले यांच्या न्यायालयाने मंगळवारी (दि. १७) हा निर्णय सुनावला. बाबुराव जानराव कठाणे (३५) प्रज्ञा बाबुराव कठाणे (३१, रा. तिवसा ) असे शिक्षा झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. दरम्यान, कठाणे दाम्पत्याला जन्मठेप झाल्याने त्यांची सव्वा वर्षाची िचमुकली मात्र आईवडिलांच्या सहवासाला दुरावली आहे. नंदू बाबूराव हे दोघे सख्खे भाऊ ितवसा येथील वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये एकाच घरात राहत होते. १९ जानेवारी २०१४ च्या रात्री नंदू आणि बाबूरावचा घरगुती वाद झाला. या प्रकरणाची बाबूरावची पत्नी प्रज्ञा हिने तिवसा पोलिसांत तक्रार दिली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी बाबूरावच्या घरी जाऊन नंदू बाबूरावची समज काढून परत आले. मात्र, त्यांच्यातील धुसफूस सुरूच होती. त्याच रात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा या भावंडांचा वाद झाला. त्या वेळी बाबूराव, पत्नी प्रज्ञा या दोघांनी नंदूला काठीने मारहाण सुरू केली.

नंदूला मारहाण करताना नंदूच्या पुतण्याने हे पाहिले धावत ठाण्यात जाऊन पोलिसांना घटनेची माहिती िदली. त्यानंतर तिवसा पोलिस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र, पोलिस घटनास्थळावर येईपर्यंत नंदू रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बाबूराव प्रज्ञा या दोघांनी नंदूला काठीने नंतर त्याच्या डोक्यावर दगडी पाट्याने प्रहार केला होता. या घटनेची माहिती मिळताच नंदू बाबूरावची आई वेणूबाईसुद्धा घटनास्थळी आल्या. त्यांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी बाबूराव प्रज्ञा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तपास पूर्ण करून हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एकूण दहा साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. बाबूराव त्याची पत्नी प्रज्ञा या दाेघांनी िमळून नंदूचा खून केल्याचे सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची िशक्षा सुनावली.

चिमुकलीची व्यवस्था करण्याची विनंती

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या बाबुराव प्रज्ञा या दाम्पत्याला जेमतेम सव्वा वर्षाची चिमुकली आहे. आम्ही दोघेही आता शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात राहणार असल्याने आमच्या चिमुकलीचे संगोपन करण्याची कारागृहाबाहेर व्यवस्था करावी, अशी विनंती प्रज्ञाने न्यायालयाकडे केली. या वेळी न्यायालयाने ती मान्य करून लवकरच तशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.