आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HVPM Cricket Competition In Blue Team On The Way To Win

ब्ल्यू संघही विजयाच्या वाटेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विजेतेपदासाठी ब्ल्यू आणि यलो संघाच्या खेळाडूंमध्ये चुरशीची लढत सुरू असतांनाचा छायाचित्र )
अमरावती- धारदारमाऱ्यासह प्रथमेश खारोळेने धावांत घेतलेल्या तीन बळींच्या आधारे एचव्हीपीएम ब्ल्यू संघाने मान्सून लीगच्या १० व्या सामन्यात यलो संघावर १० गड्यांनी दणदणीत मात करून विजयी वाटेवर पाऊल ठेवले.
जिल्हा हाैशी क्रिकेट संघटना एचव्हीपीएम क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने टर्फ विकेटवर सुरू असलेल्या या लीगच्या १० व्या सामन्यात एचव्हीपीएम यलो संघाने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र तो त्यांच्या अंगलट आला. ब्ल्यू संघाच्या गोलंदाजांनी धारदार किफायती मारा करून फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले. परिणामी, यलो संघाचा १२.४ षटकांत ५२ धावांत खुर्दा झाला. नवव्या सामन्यात १४६ धावांची शतकी खेळी करणाऱ्या वेदांत जाजूने संघाला सावरण्याचा प्रयत्न करताना ३५ धावांची खेळी केली. परंतु, इतर फलंदाज पूर्णत: अपयशी ठरले. ब्ल्यूचा मध्यमगती गोलंदाज प्रथमेश खाराळेने भेदक माऱ्यासह केवळ धावांत तीन फलंदाजांची शिकार करून यलोच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यानंतर शिवम कराळेने २१ धावांत तीन फलंदाज तंबूत धाडले अन् उरलेली कसर मल्हार जोशीने पूर्ण केली. मल्हारनेही घातक गोलंदाजीसह २४ धावांत तीन फलंदाज परत पाठवले.

ब्ल्यूच्या फलंदाजांपुढे ५५ धावांचे फारच सोपे विजयी लक्ष्य होते. ते त्यांनी अगदी सावधपणे खेळत एकही फलंदाज गमावता ११ षटकांत पूर्ण केले. अनुकूल शिंगवेकरने नाबाद २४ धावा फटकावल्या अन् अभिषेक बनकरने नाबाद २२ धावांची खेळी केली. या दोघांनीही सलामीला ५५ धावांची भागीदारी करून संघासाठी विजयी धावसंख्या फळ्यावर लावली. यलोच्या एकाही गोलंदाजाला बळी मिळवता आला नाही.

यलोचीफलंदाजी जाजूच्या खांद्यावर : यलोसंघाची फलंदाजी ही वेदांत जाजूवर अवलंबून आहे. या सामन्यात त्याला ३५ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्येकच सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करता येणार नाही, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे.