आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

105 आदर्श शिक्षकांना मिळणार ‘टॅबलेट’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, या उदात्त हेतूने 2012-13 मधील आदर्श पुरस्कारप्राप्त 105 शिक्षकांना लवकर टॅबलेट पीसी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

ई-गव्हर्नन्स प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत अल्प सूचना निविदा प्रक्रियेतून टेबलेट पीसी खरेदी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे विहित मार्गाने शिक्षण संचालनालय पुणे यांच्या स्तरावरून निविदा प्रक्रिया करण्यात आली असून, 105 टॅबलेट पीसीकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. ई-गव्हर्नन्स प्रकल्प अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी पाच सप्टेंबर 2012 रोजी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी शिक्षकांना लॅपटॉप, संगणक वा तत्सम साधने उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.