आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत फलकांनी कोंडला चौकांचा श्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - चौकाचौकांत लावण्यात आलेल्या 3200 तात्पुरत्या अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिकेने कारवाई केल्यानंतरही अनेक ठिकाणी फलक दिसून येत आहेत. या अनधिकृत जाहिरात फलकांच्या विळख्याने वाहतुकीसही धोका निर्माण झाला आहे.

प्रमुख चौकांमध्ये तात्पुरते फलक लावण्यासाठी महापालिकेच्या बाजार परवाना विभागाच्या परवानगीची गरज असते. त्यासाठी विशेष शुल्क आखण्यात आले आहे. तरीही नियमांना तिलांजली देत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे फलक लावली जात आहेत. महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने या कामासाठी सेल्स इंटरप्रायजेस या एजंसीची नेमणूक केली आहे. नोंदणीसाठी कुणी येत नसल्याने एजन्सीला फक्त अनधिकृत फलक काढण्याचेच काम करावे लागत असल्याचे स्पष्ट होते.

विविध कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठी आयोजक फलक लावतात. यासोबतच नेत्यांचे वाढदिवस, निवड, नियुक्ती आदींचे फलकही दररोज झळकतच असतात. महापालिकेने मोहीम राबवल्यानंतरही एक फलक काढले, की त्या जागेवर दुसरे तयारच असते. वर्दळीच्या चौकांमध्ये नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोक्याच्या जागा नेहमीच फलकांनी गजबजून गेलेल्या असतात.