आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विद्यावेतनामध्ये करावी वाढ’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी महामंडळाच्या विभागीय अधिक्षकांना युवासेनेच्या नेतृत्वात उमेदवारांनी गुरूवारी (दि. २४) निवेदन दिले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींना सुधरीत रकमेनुसार वेतनाच्या ९० टक्के निकषाप्रमाणे विद्यावेतन लागू करण्याचा निर्णय २२ सप्टेंबर २०१४ रोजी घेण्यात आला. एप्रिल २०१५ मध्ये तातडीने विद्यावेतनात वाढ करण्याची सुचना महामंडळाने केल्यानंतरही अद्यापपर्यंत सुधारित वेतनवाढ मिळाली नाही, असे शिकाऊ उमेदवारांचे म्हणने आहे.

केंद्र शासनाच्या निर्णयानुसार महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या ९० टक्के रक्कमेनुसार विद्यावेतन मंजूर करण्याचे निर्देश होते. आठ महिने उलटून गेल्यावरही महामंडळाने वाढीव विद्यावेतन मंजूर केले नाही. त्यामुळे या वर तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर युवासेनेचे राहुल माटोडे, ललीत झंझाळ, मिथुन सोळंके, विशाल आठवले, निलेश सावळे आदींच्या नावासह उमेव्दारांच्या स्वाक्षरी आहेत.
एसटीच्या विभागीय कार्यालयात शिकाऊ उमेदवारांच्या प्रश्नासाठी युवासेनेच्या वतीने विभागीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.