आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जावयाच्या वडिलाचे अपहरण, चौघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रात्रीच्या सुमारास जावयाच्या घरात प्रवेश करून रिव्हॉल्हर चाकू दाखवून अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र जावयाने आपली कशी बशी सुटका करवून घेतली. मात्र, समोरच्या व्यक्तींनी जावयाच्या ६१ वर्षीय वडिलाचे अपहरण करून यवतमाळला नेले. हा घटनाक्रम वलगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडला असून वलगाव पोलिसांनी गुरूवारी चार जणांना यवतमाळवरून अपहरणच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
विनोद श्यामराव पवार (३०), जयराम श्यामराव पवार (२६), पप्पू ऊर्फ प्रवीण बाबुलाल सोळंके रा. नवीवस्ती बडनेरा (२५) आणि श्याम सोळंके असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जयसिंग देविदास सोळंके (३२ रा. वलगाव) असे तक्रारदाराचे नाव आहे. बुधवारी (दि. ३) रात्री १२ वाजताच्या सुमारास जयसिंग सोळंके यांच्या पत्नीचे भाऊ अन्य नातेवाईक असे २० ते २५ जण तीन चारचाकी वाहनाने वलगावात आले. ते थेट सोळंके यांच्या घरात घुसले. त्यावेळी जयसिंग घरात झाेपले होते. त्यांना जबरीने झोपेतून उठवले. याचवेळी चाकू रिव्हॉल्वर दाखवून सोबत चल, असा दम दिला. मात्र जयसिंगने आपली सुटका करून घेतली. त्यामुळे या सर्वांनी जयसिंग यांचे वडील देविदास (६१) यांचे अपहरण करून यवतमाळला नेले. जयसिंग यांनी पोलिसांना गुरूवारी पहाटेच माहिती दिली. ठाणेदार राध्येश्याम शर्मा यांनी तातडीने तपास पथक यवतमाळला रवाना करून आरोपींना अटक केली. तर बाबा पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला.
का घडले प्रकरण
जयसिंगत्याच्या पत्नीचा बुधवारी दुपारी माहेरी जाण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी एकटीच माहेरी निघून गेली. ती एकटी गेल्यामुळे जयसिंगने त्याच दिवशी जावून तीला वलगावला परत आणले. त्यानंतर त्याच्या पत्नीने माहेरी फोन करून सांगितले की, पतीने मारहाण केली आहे. त्यामुळे त्याच रात्री जयसिंगच्या सासरची मंडळी आली त्यांनी हा प्रताप केला असल्याचे वलगाव पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.