आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापड दुकानाची प्राप्तीकर विभागाकडून झाडाझडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरातील एका नामांकित कापड दुकानाची मंगळवारी प्राप्तीकर विभागाकडून तपासणी करण्यात आली. नागपूर, अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून प्राप्तीकर विभागाचे 12 ते 15 जणांचे पथक शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हे प्रतिष्ठान गाठून तपासणीला सुरुवात केली.

दुकानाचे शटर अध्रे बंद करून अधिकार्‍यांनी कागदपत्रांची तपासणी केली. वर्षभरातील हिशोबाच्या वह्या, रजिस्टरच्या नोंदी, बिलबूक, खरेदी-विक्रीच्या फायली, कर्मचार्‍यांचे पगारपत्रक, बँकेच्या खात्याचा तपशील, बँक स्टेटमेंट, पैसे भरल्याच्या पावत्या, चेकबूक अशा सर्व दस्तावेजांची आयकर अधिकार्‍यांनी तपासणी केली. यादरम्यान प्रतिष्ठानातील कर्मचार्‍यांना बाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. ग्राहकांसाठी दुकानातील नियमित व्यवहार दुपारी साडेबारापासून बंद ठेवण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रतिक्रिया देण्यास किंवा नावांचा तपशील देण्यास नकार दिला. संबंधित प्रतिष्ठानाच्या मालकाशीदेखील रात्री उशिरापर्यंत संपर्क होऊ शकला नाही. मंगळवारी दिवसभर चौकशीची प्रक्रिया सुरूच होती, असे कळते.