आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incomplete Irrigation Projects In The District Should Be Completed Promptly

जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला. )
अमरावती- सामूहिक प्रयत्न आणि क्षमतेतून सिंचन क्षमतेच वाढ करण्याचे निर्देश पर्यावरण, उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. जिल्ह्यात १२ हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेला निम्न पेढी प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प अाहे, तर उर्वरित अपूर्ण प्रकल्प समन्वयातून पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंचन प्रकल्पांचा आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते.
निन्म पेढी प्रकल्प हा २७०० हेक्टरमध्ये पसरलेला उत्तम सिंचन क्षमतेचा प्रकल्प आहे. यामळे परिसरातील शेतीला शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होईल. या प्रकल्पामळे बाधित झालेल्या अळणगाव, कुंड खर्द, कुंड सर्जापूर, गोपगव्हान, हातुर्णा या पाच गावांचे पुनर्वसन संबंधितांना भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
ज्या प्रकल्पाचे काम सरु आहे, तिथे येत असलेल्या अडचणींचा गोषवारा तयार करावा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अडचणीं सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यातील अप्पर वर्धा, सापन, पुर्णा, चंद्रभागा, राजूरा , चारगढ या सर्व प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी भूमी अधिग्रहण प्रकल्पांमळे बाधित होणाऱ्या गावांचे पनर्वसन याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रकल्प उभारताना प्रकल्प बांधितांचे पुनर्वसन त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला देणे ही महत्वाची बाब आहे. यासाठी भूसंपादन, महसूल अधिकाऱ्यांनी जागेचे सर्वेक्षण, गावठान, कुटुंब संख्येच्या अनषंगाने कलम ११ कलम १९ नसार अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिल्या. जिल्हाधिकारी किरण गित्ते, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राम सिध्दभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता आर. पी. लांडेकर, आर. व्ही. जलतारे, कार्यकारी अभियंता स. पा. आडे, स.ना. लढ्ढा, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, श्यामकांत मस्के, ललीत वऱ्हाडे, भूसंपादन अधिकारी, मदत नर्वसन अधिकारी आदी उपस्थित होते.