आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Banks' Association And The United Forum Of Banks Union Strike Issue

दीडशे कोटींचा व्यवहार होणार ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन आणि इंडियन बँक्स असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बुधवारी अमरावतीमध्ये सुमारे दीडशे कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अमरावती शहरात अठरा राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा आहेत. त्या सर्व बंद राहणार असल्यामुळे कोणत्याही शाखेचा धनादेश वटवला जाणार नाही. शिवाय एटीएमवरील व्यवहारांवरही याचा परिणाम होणार आहे. एसबीआयच्या मुख्य शाखेतच सर्व बँकांचे ‘िक्लअरिंग हाउस’ आहे. नेमके तेच बंद राहणार असल्यामुळे धनादेश वटवण्याचे पूर्ण कार्यच ठप्प पडणार आहे. बँकांच्या विलीनीकरणाला िवरोध आणि कालावधी उलटून गेल्यानंतरही नवा वेतन करार झाल्याने संप पुकारण्यात आलाय. स्थानिक ८०० अधिकारी-कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत.
एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंिडया, इंडियन ओवरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक ऑफ इंडिया आदी अठरा बँकांचे अधिकारी-कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन आणि इंडियन बँक्स असोसिएशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व नऊही बँकांचे प्रतिनिधी सुरेंद्र टेंभुर्णे, सुधीर लसनापूरकर, चंद्रकांत खानझोडे, प्रभाकर गंभीर, मनोज वर्मा यांनी या आंदोलनाची तयारी केली आहे.

बीओआयसमोर करणार निदर्शने
संपातसहभागी असणाऱ्या सर्व नऊही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बुधवारी सकाळी ११ वाजता बँक ऑफ इंडियाच्या (बीओआय) जय स्तंभ शाखेसमोर निदर्शने करणार आहेत. तासभर ही निदर्शने केली जातील, असे फोरमचे पदाधिकारी सुनील टेंभुर्णे यांनी सांगितले.