आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीर्णोद्धार झालेला पूल खचला, अनर्थ टळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राजापेठ चौकातील भारतीय महाविद्यालया समोरील वस्तीतील जीर्णोद्धार झालेला पूल गुरुवारी अचानक खचल्याने परिसरात खळबळ उडाली.

पुलावर रंग देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या चार दुर्गा मूर्ती ठेवलेल्या होत्या. दुर्गामातेची मूर्ती नेताना पूल कोसळून ही घटना घडली. हळूहळू हा पूल खचल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला; परंतु मूर्तिकारांच्या पाच मूर्तींचे नुकसान भक्तांना किरकोळ दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वस्तीत भगवान गोरले नामक मूर्तिकार गणेश दुर्गा मूर्ती तयार करण्याचे काम करतात. वस्तीच्या दुसऱ्या बाजूस त्यांचा मूर्ती तयार करण्याचा कारखाना असल्याने कारखाना वस्ती यांना जोडणारा हा पूल आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या लाकडी पुलाचाच वापर करण्यात येत होता. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास भानखेडा येथील दुर्गोत्सव मंडळ मूर्ती घेण्यासाठी आले असता, पुलावर ठेवण्यात आलेल्या दुर्गामूर्ती सोबतच भक्तगण नाल्यात कोसळले. याबाबत वस्तीवरविविध चर्चांना पेव फुटले होते.
पुलाची होती धास्ती
पुलाच्यापलीकडे गोरले यांचा मूर्ती तयार करण्याचा कारखाना असल्याने या लाकडी जीर्ण झालेल्या पुलालाच वापर करावा लागत होता. दुर्गा मूर्तीसोबतच गणेश मूर्ती याठिकाणी तयार करण्यात येतात. त्यामुळे शेकडो नागरिकांची रेलचेल याच पुलावरून हाेत होती. भीती मनात ठेवूनच या पुलाचा वापर करीत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी या घटनेनंतर दिल्या आहेत.