आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पदभार सोपवून होणार सीआयडीला रुजू’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भारतीय पोलिस सेवेत कार्यरत असताना माझी पुणे येथे झालेली बदली हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे. अमरावतीच्या नवीन आयुक्तांना पदभार सोपवून पुणे येथे सीआयडी विभागात पोलिस उपमहानिरीक्षक पदावर लवकरच रुजू होणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी दिली.
बदली झाल्यानंतर सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत पाटील बोलत होते. शहरवासीयांच्या सहकार्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यशस्वी झालो, असेही ते म्हणाले. पावणेदोन वर्षांच्या कालावधीत गुन्हेगारीवर लगाम कसण्यासाठी नेहमीच येथील नागरिकांनी सहकार्य लाभले. 21 महिन्यांच्या कालावधीत अमरावती शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचे सप्रमाण सिद्ध करण्यासाठी पुरावे आणि ताळेबंद उपलब्ध आहे. माझ्या कार्यकाळात एकूण 3,619 गुन्हे दाखल झाले. त्यांपैकी 2,416 गुन्हे उघडकीस आले. हत्या, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, विश्वासघात, पळवून नेणे, विनयभंग आदी गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले, असा दावा पाटील यांनी केला. पत्रपरिषदला सहायक पोलिस आयुक्त श्वेता खेडकर, पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम हे अधिकारीही उपस्थित होते.