आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयाच्या जल्लोषात पापण्याही ओलावल्या! विद्यापीठ संघांनी साजरा केला ‘आनंदोत्सव’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या ‘इंद्रधनुष्य-२०१४’ या बाराव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवा महोत्सवाचा रविवारी थाटात समारोप झाला. विद्यापीठातील मुख्य रंगमंचावर दुपारी बक्षीस वितरण समारंभ झाला. विविध विद्यापीठांच्या संघांनी बक्षिसांची लयलूट करत जल्लोष साजरा केला. बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईने विजयाचा जल्लोष तर साजरा केलाच, मात्र अवघ्या महाराष्ट्रातील कलाकारांच्या भेटी घडवून आणणारा अमरावती विद्यापीठाचा परिसर सोडताना अनेकांच्या पापण्या नकळत ओलावल्या.
बक्षिसासाठीनाव जाहीर होताच अक्षरश: नाचत, बागडत व्यासपीठावर येणारी तरुणाई या नििमत्ताने पहायला मिळाली. विजयी संघाचे संघ व्यवस्थापक विद्यार्थ्यांनी या उत्सवाचा मनसोक्त आनंद घेत व्यवस्थापनाचे कौतुक केले. मुख्य रंगमंचावर मान्यवरांची भाषणे झाली. त्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला.
नोव्हेंबरपर्यंत या महोत्सवात विविध कलाप्रकारांचा आस्वाद घेणाऱ्या मान्यवरांनी कलावंतांचे कौतुक केले. कुलगुरू डॉ. मोहन खेडकर अध्यक्षस्थानी होते. या महोत्सवातील आठवणी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत घेऊन जाव्या, काही त्रुटी राहिल्या असतील, तर सांगाव्या, असे आवाहन कुलगुरूंनी केले. या महोत्सवाकडे स्पर्धा म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पहावे. आलेल्या संधीचे सोने करावे, असे डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी सांगितले.
शोभायात्रेचे पारितोषिक वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले. सोलापूर विद्यापीठ सोलापूरला प्रथम, तर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संघाला िद्वतीय पारितोषिक मिळाले. शारिरीक शिक्षण रंजन मंडळाचे अध्यक्ष प्रा. एम. टी. देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर डॉ. हेमंत खडके डॉ. अलका गायकवाड यांनी संचालन केले. डॉ. अविनाश असनारे यांनी बक्षीस वितरणाचे संचालन केले. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य सोमेश्वर पुसदकर, डॉ. एस. डी. कतोरे, डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. संतोष ठाकरे, डॉ. अर्चना बोबडे, डॉ. भय्यासाहेब मेटकर, डॉ. अजय देशमुख, डॉ. जे. डी. वडते, डॉ. अरविंद देशमुख आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक
संतगाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील इंद्रधनुष्य युवा महोत्सवात मुख्य रंगमंच, पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागाचे सभागृह, दृकश्राव्य सभागृह, विद्यार्थी कल्याण भवनचे सभागृह या ठिकाणी विविध सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अरविंद देशमुख, शारीिरक शिक्षण रंजन मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महोत्सवात सेवा दिली. विद्यापीठातील पदाधिकारी पाहुण्या मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संगीत कलाप्रकार
शास्त्रीयगायन : आराधनाहेगडे - एसएनडीटी, मुंबई
तालवाद्य: प्रसादलोहार - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
स्वरवाद्य- अदितीगराडे, एसएनडीटी, मुंबई
सुगमसंगीत - वाचस्पतीचंदेल, अमरावती विद्यापीठ.
पाश्चिमात्यगायन - श्रेयानायक, एसएनडीटी, मुंबई.
भारतीयसमूहगान - एसएनडीटी,मुंबई
पाश्चिमात्यसमूहगान - एसएनडीटी,मुंबई
लोकसंगीतवाद्यवृंद -स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

ब.नृत्य कलाप्रकार
लोक/आदिवासीनृत्य - वसंतरावनाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
शास्त्रीयनृत्य - निकिताबानावलीकर, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
क.साहित्य कलाप्रकार
प्रश्नमंजूषा- मुंबईविद्यापीठ, मुंबई
वक्तृत्वस्पर्धा - अश्विनीवडगावे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
वादविवाद- शिवाजीविद्यापीठ, कोल्हापूर.

.रंगमंचीय कलाप्रकार
एकांकिका- मुंबईविद्यापीठ, मुंबई
स्किट- महाराष्ट्रपशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
मूकनाट्य - एसएनडीटी,मुंबई
नकला- सद्दामशेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

इ.ललित कला
स्थळचित्र- प्रवीणगवळी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
चिकटकला- शिवशक्तीगोडसेलवार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
पोस्टरमेकिंग - सागरदत्ता, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
मातीकला- गोन्सालवेविश्वास, मुंबई विद्यापीठ.
व्यंगचित्रे- श्रेयसबेंद्रे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.
रांगाेळी- प्रतीक्षावाघमारे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
स्थळछायाचित्रण - यशसावला, महाराष्ट्र पशू मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
पारितोषिक वितरणानंतर सहभागी स्पर्धकांनी मुख्य रंगमंचासमोर ढोल-ताशे वाजवत आनंद साजरा केला.