आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’चा अनुभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- डोक्यात भाल्याचे खोल वार, रक्तानं माखलेल्या जखमा अन् मंद होत चाललेला श्वास; अशा अवस्थेतील अजगराची वन्यजीव संरक्षक राघवेंद्र नांदे यांनी दोन महिने शुर्शूषा केली. नांदे व वनविभागाच्या सहकार्याने या अजगराला जीवदान मिळाले. हा प्रसंग ‘हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ या अभंगाची आठवण करून देणारा आहे.

वडाळीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे आणि वन्यजीव संरक्षक राघवेंद्र नांदे यांनी या अजगराला पोहर्‍याच्या जंगलात सोडले. नांदे यांनी सुमारे दोन महिने या अजगराची शुर्शूषा केली. तालुक्यातील बोरगाव धर्माळे येथे एक अजगर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याची माहिती मिळाल्यावर नांदगावपेठ येथील अक्षय शेंदरकर व रोहित देशमुख यांनी त्यास अमरावती शहरात आणले. पशुचिकित्सक डॉ. मुत्तेवार यांनी अजगरावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर नांदे यांच्याकडे अजगराला सोपवण्यात आले. नांदे यांनी सुमारे दोन महिने या अजगराची सुर्शुषा केली. पूर्ण बरा झाल्यानंतर या अजगराला पोहर्‍याच्या जंगलात सोडण्यात आले. या वेळी वनविभागाचे वतरुळ अधिकारी उपस्थित होते.

सर्पमित्रांना बोलवा
साप, अजगर यांसारखे प्राणी शेतकर्‍यांचे मित्र आहेत. शेतातील उंदीर, घुशी फस्त करण्याचे काम हे प्राणी करतात. त्यामुळे त्यांना मारणे चुकीचे आहे. साप, किंवा अजगर जखमी अवस्थेत आढळल्यास सर्पमित्रांना पाचारण करावे. पी. के. लाकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी.

दोन महिने उपचार
जखमी अजगराच्या डोक्यात भाल्याचे वार होते. एवढय़ा खोल जखमा भरतील, अशी अपेक्षा नव्हती. सुमारे महिनाभर त्याने जीभ बाहेर काढली नाही. इंजेक्शनवरच तो जिवंत होता. त्याच्या जखमा भरायला दोन महिन्यांचा कालावधी लागला. राघवेंद्र नांदे, वन्यजीव संरक्षक.