आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय परिषद, विद्यापीठात राहणार जगभरातील वैज्ञानिकांची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - 'सामान्यसापेक्षता सिद्धांताची शंभर वर्षे' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद अमरावतीत नोव्हेंबरमध्ये आयोजित केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात होणा-या या परिषदेत सामान्य सापेक्षता (जनरल रिलेटिव्हिटी) सिद्धांतावर जगभरातील वैज्ञानिक विचारमंथन करणार आहेत. जगभरातील वैज्ञानिकांची मांदियाळी राहणार असल्याने विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय परिषदेची तयारी सुरुवात केली आहे.
अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी १९१५ मध्ये सामान्य सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम जगासमोर मांडला होता. त्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे २५ ते २८ नोव्हेंबर २०१५ दरम्यान आयोजन केले आहे. सामान्य सापेक्षता सिद्धांताबाबत जगामध्ये असलेले मतप्रवाह एकत्र येत एकाच व्यासपीठावर या विषयावर चर्चा व्हावी, हा या परिषदेमागील उद्देश आहे. सामान्य सापेक्षता सिद्धांतावर पुढील संशोधन करू इच्छिणा-या जगभरातील नवसंशोधकांच्या संशोधनांना या परिषदेतून चालना मिळणार आहे.

मॅथेमॅटिक अँड न्युमरिकल जनरल रिलेटिव्हिटी, रिलेटिव्हिटिक्स अॅस्ट्रोफिजीक्स अँड कॉस्मोलॉजी, मॉडिफाइड थेरीज ऑफ ग्रॅव्हिटेशन, एक्सपेरिमेंटल अँड ऑबझर्व्हेशन ग्रॅव्हिटी, कॉन्टम ग्रॅव्हिटी, ब्लॅक होल फिजीक्स डार्क मॅटर अँड एनर्जी या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषदेत चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे.

यासोबत सामान्य सापेक्षता सिद्धांताशी संबंधित शोधप्रबंध वाचन सत्रदेखील होणार आहे. गणित, भौतिकशास्त्र तसेच खगोलशास्त्राशी संबंधित असलेल्या सामान्य सापेक्षता या विषयावर अमरावतीत चार दिवस विचारमंथन होणार असल्याने या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परिषदेला दहा महिन्यांचा कालावधी असला तरी आयोजनाबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तयारी सुरू झाली आहे.

महान संशोधनाच्या संशोधनावर चर्चा
अल्बर्टआइन्स्टाइन या महान संशोधकाच्या सामान्य सापेक्षता या सिद्धांतावर चर्चा होणार असल्याने अमरावतीकरांसाठी हा क्षण फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. आयझॅक न्यूटनने दिलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ज्या वेळेस दिला होता, त्याच्या काही वर्षांनंतर अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत दिला होता. या जगातील दोन मोठ्या घटना होत्या, त्या घटनांचा उजाळा मिळणार असल्याने या आंतरराष्ट्रीय परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.