आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrigation Project Issue At Amravati, Divya Marathi

हजारो एकराचे सिंचन पाच वर्षांनंतरही कागदावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अप्पर वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यावरून पाणी घेऊन गुरुकुंज मोझरी येथील दास टेकडीवरून परिसरातील 15 गावांच्या शेतीचे सिंचन करण्यासाठी उपसा सिंचन प्रकल्प मंजूर झाला. या प्रकल्पामुळे 15 गावांतील 17 हजार 700 एकराहून अधिक जमीन सिंचनाखाली येणार आहे. तूर्तास पाच किमी पाणी वाहून नेण्यासाठी पाइप या ठिकाणी पाच महिन्यांपूर्वी येऊन पडलेत. हीच या प्रकल्पाची आतापर्यंतची प्रगती आहे.

प्रकल्पाला 13 जुलै 2009 ला मान्यता प्रदान करण्यात आली. 212.63 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी तांत्रिक मान्यता आणि 39.78 कोटी निधी 1 ऑगस्ट 2009 ला मंजूर करण्यात आला. काम सुरू करण्याचे आदेश 23 सप्टेंबर 2011 ला धडकले. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी 18 डिसेंबर 2012 ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते, हे विशेष.

पहिल्या टप्प्यातील काम 48 महिन्यांमध्ये म्हणजेच 22 सप्टेंबर 2015 पर्यंत पूर्ण करायचे आहे. प्रकल्पाचे काम जलसंपदा विभागाच्या ऊध्र्व वर्धा कालवे विभाग क्रमांक एक अंतर्गत करण्यात येणार आहे.