आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जफरप्रकरणी मनपा आयुक्तांना समन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चांदणीचौक गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख जफर परप्रांतात पळाल्याचे सूत्रांकडून समजते. पोलिसांना नागपुरी गेट पोलिस ठाण्याची हद्द सोडणे शक्य नसल्यामुळे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. उपमहापौर जफर हा मागील १७दिवसांपासून फरार असून, सूत्रांच्या माहितीनुसार, तो परप्रांतात दडून बसला आहे.
गोळीबार प्रकरणी पोिलसांनी जफरच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. सोमवारी रहेमतनगर येथील अहमद हुसेन याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. जफरचा पकड वाॅरंट न्यायालयाने मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर जफर आता रायपूर, विलासपूर, भोपालकिंवा हैदराबाद येथे दडून बसल्याचे समजते. गुन्हे शाखेचे पथक त्याला पकडण्यासाठी त्याच्या शोधात गेल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयाने जफरचा अटक वाॅरंट मंजूर केल्यामुळे त्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक ए. व्ही. किनगे यांनी सांगितले. दरम्यान, जफर अाता अटकपूर्व जािमनासाठी प्रयत्न करण्याची शक्यता बळावल्याचे बाेलले जाते.

-शेख जफर हे उपमहापौर आहेत. त्यानुसार त्यांना ज्या सुविधा महापािलकेकडून देण्यात आल्या होत्या, त्या तत्काळ काढून घेण्यात आल्या. वाहन काढून घेतले गेले. त्यांचा कक्षही लगेच कुलूपबंद केला गेला. महापािलकेतर्फे नगरसेवकांना देण्यात येणारे सिमकार्ड त्यांनी घेतलेच नव्हते. अरुणडोंगरे, आयुक्त,महापािलका, अमरावती.
-महागरपालिकेचे आयुक्त यांचे स्वीय सहायक यांच्याकडे समन्स दिला. जफर हे उपमहापौर असल्याने महानगरपालिकेकडून त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आयुक्तांना समन्स बजावून त्यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत ते आले नाहीत. रियाजुद्दिनदेशमुख, पोलिसनिरीक्षक, क्राइम ब्रांच.