आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावतीकर फस्त करतात पाच टन जांभूळ; 300 फेरीवाले करतात जांभळाची विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जांभळाच्या हंगामास नुकतीच सुरुवात झाली आहे. अमरावतीकर दररोज पाच टन जांभूळ फस्त करत असल्याचे चित्र आहे. हंगामाच्या सुरुवातीला नागपूरहून आयात होत असलेला प्रतिकिलो 200 रुपयांवरील जांभळाचे दर जिल्ह्यातून माल यायला लागल्याने 40 ते 60 रुपयांवर आले आहेत.

गर्द जांभळ्या रंगाचा, गोड-तुरट चवीच्या आरोग्यवर्धक जांभळाची प्रत्येकासच प्रतीक्षा असते. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर मृग नक्षत्रात जांभळाच्या झाडावर फळं येतात. पोटाच्या विकारावर जांभूळ गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. सध्या प्रतवारीनुसार 20 रुपयांपासून 60 रुपये किलोपर्यंत जांभळाची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जून-जुलै महिन्यात जांभळाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. झटपट व विना कटकटीचा व्यवसाय असल्याने बहुतांश फेरीवाले जांभूळ विक्रीचा व्यवसाय करतात, असेही काही विक्रेत्यांनी सांगितले.

कोठून येतो माल?
शहरात छिंदवाडा, जबलपूर व मध्य प्रदेशातील इतर भागातून जांभूळ येतात. जिल्ह्यातील मेळघाट, ब्राम्हणवाडा थडी व शिरसगाव कसबा येथून जांभळाची आयात करण्यात येते. विशेषत: मेळाघाटच्या जांभळाला अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
आरोग्यवर्धक जांभूळ
४ उन्हाचा दाह कमी करण्यासाठी जांभूळ उत्तम फळ आहे. उन्हाळा, पावसाळ्यादरम्यान पोटाचे विकार बळावतात. त्याच्यावर जांभूळ हा उत्तम उपाय आहे. त्याचप्रमाणे हृदय तसेच मधुमेह रुग्णांसाठी जांभूळ उपयुक्त ठरतो. त्वचेसाठीही ते उपयुक्त आहे.
- अर्चना तेलंग, आहारतज्ज्ञ.
चेहर्‍यावर येते तेज
४ जांभळाचे अनेक फायदे आहेत. आरोग्यवर्धक असल्याने कुठल्याही वर्षी मी जांभळाचे सेवन चुकवलेले नाही. जांभळाचे बी उगाळून चेहºयावर लावल्यास कांती उजळते. चेहर्‍यावरील मुरूम व पुटकळ्यांवरही हा लेप गुणकारी आहे.
- कविता वाटाणे, नागरिक.
कॅरेटचे दर 700 रुपये
सुरुवातीला नागपूर येथून जांभळाचा माल बोलावण्यात येत होता. त्यामुळे प्रतिकॅरेट 2000 रुपये आणि 200 रुपये किलोच्या दराने जांभूळ विकले गेले. आता आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. सध्या प्रतिकॅरेट 700 रुपये दराने विक्री होत आहे.
शहरात 300 फेरीवाले
४ शहरात सध्या साधारणत: 300 फेरीवाले जांभळाचा व्यवसाय करतात. प्रत्येक फेरीवाला दररोज सुमारे एक क्विंटल मालाची विक्री करतो.
शेख समीर, जांभूळ विक्रेता.