आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय - महायुतीचे सरकारच सत्तेत आणा - जयकुमार रावल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘महाराष्ट्रात सुराज्य आणण्याचे कै. बाळासाहेब ठाकरे, कै. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप-शिवसेना, रिपाइं महायुतीचे सरकार राज्यात आणा’, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. जयकुमार रावल यांनी केले.

भाजप जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ते संबोधित करत होते. व्यासपीठावर प्रदेश निरीक्षक सीमाताई हिरे, खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. डॉ. रणजित पाटील, डॉ. अशोक ओळंबे, रणधीर सावरकर, किशोर पाटील, विजय अग्रवाल, सिद्धार्थ शर्मा, गोपाल खंडेलवाल, वसंत बाछुका, भारती गावंडे, दीपक मायी, पुष्पा भांबरे, मनोहरराव राहणे, गजानन खारोडे, किशोर गुजराती आदी होते.

गेल्या 15 वर्षात राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली, भारनियमन, महागाई, भ्रष्टाचार, यामुळे जनता कंटाळली. काँग्रेस-राकाँ आघाडी सरकारला हद्दपार केल्याशिवाय जनतेची सुटका होणार नाही. मतदाराला मतदान केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडल्यास सुराज्य आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही रावल यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये लोकशाही असून, प्रत्येकाच्या भावनेची येथे कदर केली जाते. पक्षनिरीक्षकांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मते जाणून घेतली जात आहे. पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवा, असे आवाहन सौ. हिरे यांनी केले.

मतदारांची पसंती व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करणाºयाला उमेदवारी दिली जाईल, असे खा. संजय धोत्रे यांनी सांगितले. त्याग, तपस्या, बलिदान या गोष्टींकडे कार्यकर्त्याने लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक ओळंबे, सुत्रसंचालन दीपक मायी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार गजानन खारोडे यांनी मानले.