आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुभाजक तोडून जीप धडकली ट्रकवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मालवाहू जीप रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकवर जाऊन धडकली. राजापेठ-बडनेरा मार्गावर दसरा मैदानानजीक मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. घटनेमुळे परिसरातील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. राजापेठकडून बडनेराच्या दिशेने जाणारी जीपच्या (एमएच 30 एबी 2047) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. जीपचालक केशव उघडे यांनी डावीकडून ‘ओव्हरटेक’ करणार्‍या वाहनाला बाजू देण्यासाठी जीप उजवीकडे वळवली. मात्र, नियंत्रण सुटल्याने ही जीप दुभाजक पार करून विरुद्ध दिशेने येणारा ट्रक (एमएच 31 एपी 5521) वर जाऊन आदळली. मात्र, त्यात कुणीही नागरिक न आल्याने जीवितहानी टळली. अपघातात जीपचा समोरचा भाग निकामी झाला. राजापेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जीपचालकाविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.