आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jilha Parishad Student Get Free Books From Government

जिल्हा परिषद शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, तर एक लाख ५५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सर्व शिक्षा अभियानाकडून याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली असून, पुढील सत्रात शाळेच्या पहिल्याच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके गणवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशासोबत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. यापूर्वी शैक्षणिक सत्र आरंभ झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनंतर, तर कधी-कधी तर अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यानंतर पाठ्यपुस्तके दिली जातात. शालेय गणवेशाच्या बाबतीतही स्थिती फारशी वेगळी नव्हती. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून शासन तसेच प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत.

पाठ्यपुस्तके आणि गणवेशाची वेळेवर वाटप करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारसदेखील शासनाकडे करण्यात आली. आगामी शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके गणवेश मिळतील, याचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शालेय पाठ्यपुस्तके, गणवेश मिळणार आहेत. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.