आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर आठ वर्षांनंतर लागला वैशालीच्‍या हत्‍येचा निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- वैशाली चर्जनच्या मृत्यूनंतर अखेर तब्बल आठ वर्षांनंतर तिला आणि तिच्या नातेवाइकांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया शहरातील विधिज्ञांनी व्यक्त केली आहे. वैशालीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी झाल्यानंतर वैशालीची हत्याच झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर तिच्या सारसकडील मंडळीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता.

घटनेच्या दिवशी वैशालीचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये आढळला होता तसेच मृतदेहाच्या बाजूला विषाची बॉटलीही होती. त्यामुळे वैशालीने विष घेऊन आत्महत्या केली, असे तिचे पती व सासरचे मंडळी सांगत होते. मृतदेह आढळताच त्यांनी वैशालीच्या नातेवाइकांना ही माहिती दिली होती. त्यावेळी अमरावतीत राहणारे वैशालीचे काका कर्नल विश्वास काळे यांनी तातडीने वैशालीचे घर गाठले होते.

पोलिसांची दंडेलशाही :
कर्नल काळे यांनीही तिच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली होती. यानंतर वैशालीच्या वडिलांनी नांदगावपेठ पोलिसांत मुलीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, तत्कालीन ठाणेदार मोफीजमिया बापूमिया देशमुख यांनी या प्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणात योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप करत त्यांनी 13 ऑक्टोबर 2005 ला नांदगावपेठ ठाणे गाठले असता, पोलिसांनी त्यांनाच ठाण्यात बसवून ठेवले होते.

चोरीचा बनाव, लाच मागितल्याचा आरोप :
काळे यांनी आमच्या घरात अडीच लाखांची चोरी केली तसेच वैशालीचा 13 वर्षीय मुलगा अधिराज याच्या अपहरणाचा काळे यांनी प्रयत्न केल्याची तक्रार चर्जन यांनी पोलिसांत दाखल केली. या तक्रारीवरून नांदगाव पेठ पेालिसांनी माणिक काळेंविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, तत्कालीन उपनिरीक्षक काशीनाथ अपार यांनी वर्धा येथे माणिक काळे यांच्याकडे प्रकरण कमकुवत करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. चर्जन यांनी वैशालीच्या मृत्यूचे प्रकरण कमकुवत करण्यासाठी सात लाख रुपये दिलेत, तुम्हीही पैसे द्या, असे अपार यांनी काळे यांना सांगितले होते. काळे यांनी अपार यांना पैसे देण्यास नकार दिल्यावर अपार यांनी तेथून काढता पाय घेतला.

उसनवारी ठरली हत्येचे कारण :
प्रवीण चर्जन याला व्यवसायात तोटा आल्यामुळे त्याने वैशालीच्या वडिलांकडून सव्वाचार लाख रुपये उसणे घेतले होते. ती रक्कम त्यांनी परत मागितली होती. म्हणूनच वैशालीची हत्या झाल्याचे सीआयडी तपासात पुढे आले. त्यामुळे या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक मोफीजमिया बापूमिया देशमुख आणि तत्कालीन उपनिरीक्षक काशीनाथ अपार हेही सीआयडीच्या तपासात दोषी आढळून आलेत. दोन्ही अधिकार्‍यांना सीआयडीने प्रकरणात हत्या, पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यात सहआरोपी केले होते. तपास पूर्ण झाल्यावर 16 जून 2007 ला सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तत्पूर्वी, नांदगावपेठ पोलिसांनी प्रवीण वसंत चर्जन, वसंत विश्वास चर्जन, सिंधू वसंत चर्जन, गया विश्वास चर्जन, प्रदीप चर्जन, मधुलिका प्रदीप चर्जन, वंदना प्रवीण चर्जन यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 4) एस. एम. भोसले यांनी वसंत विश्वास चर्जन, सिंधू वसंत चर्जन, गया विश्वास चर्जन, प्रदीप चर्जन, मधुलीका प्रदीप चर्जन, वंदना प्रवीण चर्जन यांची निदरेष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अँड. अमर देशमुख यांनी युक्तिवाद केला.