आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल विजय दिन विशेष : योद्धय़ाच्या पत्नीस 15 वर्षांपासून नोकरीची प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - 1999 मधील कारगील युद्धात रणभूमीवर पती कृष्णा समरीत यांना वीरगती प्राप्त झाली, त्या वेळी पत्नी सविता आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. पहिला मुलगा तेव्हा जेमतेम अडीच वर्षांचा असल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले. मात्र, परिस्थितीसमोर न डगमगता सविता यांनी दोन मुलांचा सर्मथपणे सांभाळ केला. मात्र, अनुकंपामध्ये सरकारी नोकरीसाठी शासनाने त्यांना कसलीही मदत केली नाही. पतीला जाऊन 15 वर्षे लोटल्यानंतरही त्यांची सरकारी नोकरीची प्रतीक्षा संपलेली नाही. कारगील विजयदिनानिमित्त त्यांनी ‘दिव्य मराठी’कडे आपली व्यथा मांडली.
1991 मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर हे दाम्पत्य कुर्व्हा, वर्हा येथे राहत होते. 30 जुलै, 1999 मध्ये पती कृष्णा शहीद झाल्यानंतर त्या माहेरी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे राहू लागल्या. सध्या कुणाल 18 वर्षांचा तर प्रज्वल 15 वर्षांचा झाला आहे. मुलांचं शिक्षण, घरखर्च खासगी नोकरी करून त्या भागवत आहेत. शिवाय सरकारी पेन्शनमधूनही कुटुंबाला हातभार लागत आहे.

जिल्ह्यातून एकमेव कारगिल योद्धा
तिवसा तालुक्यातील वर्‍हा कुर्व्हा येथील कृष्णा समरीत नायक पदावर असताना 1999 मध्ये कारगील युद्धात शहीद झाले. जिल्ह्यातून समरीत एकमेव कारगील योद्धा असल्याचे माजी सैनिक कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
कृष्णा समरीत यांच्या बद्दल थोडक्यात..
कृष्णा हे 1983 मध्ये 17 मराठा रेजिमेंटमध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते. त्यांनी बेडगाव, श्रीनगर, लेह, त्रिवेंद्रम आदी ठिकाणी ड्युटी बजावली. काही काळ श्रीलंकेतही कर्तव्यावर होते. कारगील युद्धात शत्रूशी लढताना त्यांनी वीरगती प्राप्त झाली.