आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेणाऱ्या युवकास अटक, पोलिस नाईक फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवर कारवाई करण्यासाठी १८ हजारांची मागणी करून त्यापैकी पाच हजार रुपये स्वीकारणाऱ्या पोलिस नाईकाचा साथीदार असलेल्या एका युवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनच्या आवारातच रंगेहात पकडले. तथागत केशवराव पटवर्धन (२३, कल्याणनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, ठाण्यातील पोलिस नाईक गजानन बर्डे हा घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहिती पाेलिसांनी िदली. तक्रारदार हे अमरावती सिटी बसचे चालक म्हणून आहेत. घरगुती कारणावरुन त्यांच्या पत्नीने फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात १० मे रोजी तक्रार दिली होती. त्या तक्रारीची चौकशी फ्रेजरपुराचे पोलिस नाईक बर्डे यांच्याकडे होती. या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी बर्डे यांनी तक्रारदाराकडे १८ हजार रुपायांची मागणी केली. या तक्रारीची पडताळणी केली असता बर्डे यांनी कारवाई करण्यासाठी मागणी केलेल्या १८ हजार रुपयांपैकी हजार रुपये बर्डे यांचा साथीदार तथागत यांच्याकडे देण्यास सांगितले. ठरलेल्या वेळेप्रमाणेे तथागत याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष हजार रुपयांची रक्कम ठाण्याच्या आवारातच स्वीकारली.
पोलिस नाईक फरार
बर्डेयांना कारवाईचा संशय आल्याने ते पोलिस स्टेशनमधून पळ काढला तथापि, बर्डे यांच्याविरुद्ध एसीबी पथकाकडून कायदेशीर कारवाई सुरू होती. ही कारवाई एसीबी विभागाच्या पोलिस निरीक्षक पूजा खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...