आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपाच्या नियोजनाचे शेतकऱ्यांसमोर संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती विभागात मागील वर्षीच्या खरप हंगामामध्ये सुरुवातीला पावसाने दिलेली हुलकावणी अन् त्यानंतर नोव्हेंबरमध्ये राज्य, केंद्र सरकारने जाहीर केलेला दुष्काळ आणि त्यानंतरही झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने पिकांचे झालेले मोठे नुकसान या पार्श्वभूमीवर दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या खरिप हंगामामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
गतवर्षीच्या खरिप हंगामामध्ये निसर्गाच्या अवकृपेने कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतमालाचे उत्पादन कमी झाले. परिणामी, शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागलेे. दरम्यान राज्य सरकारने दिलेली दुष्काळाची आर्थिक मदत अद्यापही दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पोहोचलेली नाही,असे वास्तव चित्र आहे. जून ते सप्टेंबर २०१३ मध्ये गारपिटीने खरडलेल्या शेतजमिनीची नुकसानभरपाई आली. मात्र, शेतकऱ्यांच्या बंॅक खात्यामध्ये अद्याप ती जमा झालेली नाही,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदाच्या हंगामात उन्हाळा सुरू झाल्यानंतर अद्यापही पावसाने पिच्छा सोडलेला नाही. सरकारने तीन वर्षांकरिता पीक कर्जाचे पुनर्गठन केल्याने खरीप हंगामाकरिता कर्जदार शेतकऱ्यांना नवे कर्ज देण्याचे बँकांचे धोरण अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या खरीप हंगामाचे नियोजन कसे करायचे, हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

शेतकरी संकटात आहे सायेब
मागच्यावर्षीचा हंगाम धुऊन निघाला. शेतकऱ्यांच्या हाती थोडी-फार आलेली रक्कम हातउधार फेडण्यात गेली. येणाऱ्या खरीप हंगामाच्या तयारीला वेळ कमी आहे. त्यात पैसा नाही.'' पी.पी. रघुवंशी, शेतकरी तळवेल, अमरावती.

कर्ज देणे गरजेचे आहे
मागच्यावर्षीचा अनुभव बघता या वर्षी शेतीमध्ये काही उत्पन्न होईल का, याबाबत शंका वाटते. शेतकरी कर्जबाजारी आहे. नवे कर्ज सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे, तरच शेतकऱ्यांचे परिवार जगतील.'' अशोकरामटेके, शेतकरी, वलगाव.

पैका आणायचा कुठून?
सोयाबीनगेले अन् हरभरा, तूर दिसलीच नाही. साडेतीन एकर शेतात वर्षभराचे नियोजन होत नाही. शेतीत उत्पन्न येत नाही. पुढच्या हंगामात आम्ही पैका आणायचा कुठून?'' शंकरगुलाब कांबळे, शेतकरी, नया अकोला.

धनादेश वटले नाहीत
अडीच एकर शेती आहे. त्यातून टॉवर लाइन गेली. ती टाकणाऱ्या कंपनीने मोबदला दिला नाही. धनादेश बँकेत वटले नाहीत. कलेक्टर ऑफिसचे उंबरठे झिजवतोय.'' अमृतबागडे, नया अकोला.