आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ मुलींचे अपहरणच झाले नाही; निघून गेल्या होत्या; सुखरूप परतल्या घरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलदोन अल्पवयीन मुली चार दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे अपहरण झाल्याचे बोलले जात असतानाच रविवारी (दि. २४) सकाळी त्या आपल्या घरी सुखरूप पोहोचल्या. मुंबईच्या पसायदान बालविकास फाउंडेशनच्या समाजसेवींनी त्यांना घरी पोहचवून दिले आहे.
२१ ऑगस्टला दोघी मुली बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा संपूर्ण शहरात शोध घेण्यात आला. मात्र, त्या आढळल्या नाहीत. अखेर पालकांनी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली. २३ ऑगस्टपर्यंत त्यांचा पत्ता लागला नव्हता. दरम्यान, शनिवारी दुपारी या दोन्ही मुली मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) येथे ‘पसायदान’ फाउंडेशनच्या सदस्यांना आढळल्या. ही संस्था अल्पवयीन बालकांच्या पुनर्वसनासोबतच वाट चुकलेल्या मुलांना तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील असहाय्य मुलांना शोधून मदत करण्यासोबतच घरी पोहोचवण्याचे काम करते. त्यासाठी सीएसटीवर संस्थेचे सदस्य कर्मचारी सतत कार्यरत असतात. मुलींनी आपण अमरावतीचे असल्याचे सांगितल्यावर मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी अमरावतीमध्ये पालकांशी संपर्क साधला. पसायदान संस्थेने मुली सुखरूप असून, रविवारी अमरावतीला घेऊन येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार बबन शिंदे, दीपाली यादव दोन्ही अल्पवयीन मुलींना घेऊन शहरात पोहोचले. फ्रेजरपुरा पोलिसांनी मुलींना पालकांच्या ताब्यात दिले. त्या वेळी, ‘आमचे कुणीही अपहरण केले नव्हते, तर रागाच्या भरात मी िनघून गेली सोबत मैत्रीणही आली’, असा जबाब त्यांना पोलिसांत नोंदवला आहे. पालकांनीही कुणावरही संशय नसून, तक्रारही नसल्याचे सांिगतले आहे.

त्या दोघींना मंुबईवरुन परत आणणारे सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते बबन शिंदे दीपाली यादव.
वाट चुकलेल्या तीनशे बालकांना घरी पोहोचवले

वाटचुकलेल्या किंवा घरातून रागाने बाहेर पडलेल्या बालकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून देणे; तसेच शिक्षणबाह्य विनापालक मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन, कौटुंबिक पुनर्वसन करण्याचे काम आमची संस्था मागील पाच वर्षांपासून करत आहे. आतापर्यंत जवळपास तीनशेपेक्षा अधिक वाट चुकलेल्या मुलांना आम्ही त्यांच्या घरांपर्यंत सुखरूप पोहोचवले आहे. बबनशिंदे, पसायदानबालविकास फाउंडेशन, मुंबई.