आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी सेविका झेडपीवर धडकल्या, थकित मानधन देण्याची केली मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चार महिन्यांपासून थकित मानधनासाठी वारंवार पाठपुरावा करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. वारंवार जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवूनही मानधन मिळालेल्या जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी महिला बाल कल्याण कार्यालयावर धडक दिली.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या (एआयटीयुसी) बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी अंगणवाडी सेविकांनी महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांना निवेदन दिले. एआयटीयुसीचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बी. के. जाधव, जिल्हा सचिव अरुणा देशमुख, अतिरिक्त जिल्हा सचिव मीरा कैथवास, उपाध्यक्ष प्रमिला राव, सुमित्रा हिवराळे, रत्नमाला ब्राह्मणे, नझिमा काजी, माधुरी देशमुख, शालु सोनोने, चंदा गायकवाड, आरीफ जहागीर, मीना वऱ्हाडे, रेखा नवरंगे, किर्ती ओगलेकर, सुभद्रा भोयर, रंजना धोटे, रंजना कडू, शीला सातपुते, रमा प्रभे यांच्यासह अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

हे कसले सक्षमीकरण
-महिलांच्या हिताच्या गोष्टी केल्या जात आहेत. परंतु, घर चालवण्यासाठी मानधनही व्यवस्थित मिळत नाही.कसे होणार महिला सक्षमीकरण. यासाठी शासनाने लक्ष घालावे. अरूणादेशमुख, जिल्हा सचिव.

तोडगा निघाल्याने केले आंदोलन
-ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या कडेही पाठपुरावा केला. परंतु कोणताही तोडगा निघाल्याने आंदोलन करावे लागत आहे. हे सरकारचे अपयश दिसून येत आहे. बी.के. जाधव, राज्य उपाध्यक्ष.

जिल्हा परिषदेपुढे धरणे देताना जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका.