आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krushi Utpanna Bazar Samiti Office Slap Collapse In Amravati

लिलाव भवनाचे साडेतीन कोटी गेले पाण्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कृषी उत्पन्न बाजार समितीत साडेतीन कोटी रुपये खर्चून सदोष बांधकाम करण्यात आलेल्या लिलाव भवनाचे छत गुरुवारी गळल्याने शेकडो पोती धान्य भिजले. दरम्यान, संबंधित कंत्राटदार व आर्किटेक्टला याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांचा माल ओला होऊ नये, ऊन, पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने 2007-08 मध्ये साडेतीन कोटी रुपये खचरून भव्य लिलाव भवन बांधण्यात आले. बांधकामाचे कंत्राट मेसर्स शिवा इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन या कंपनीचे अरविंद गुल्हाने यांना देण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे लिलाव भवनाचे टिनपत्र्याचे छत गळल्याने शेकडो पोती सोयाबीन, तूर, हरभरा आदी शेतमाल ओला झाला. लिलाव भवनात काही ठिकाणी पाण्याची डबकीही साचली.

छताचे काम सदोष: लिलाव भवनाच्या छताची टिनपत्रे चुकीच्या पद्धतीने ठोकल्यामुळे पावसाच्या धारा लागल्या. टिनावरून घसरणारे पावसाचे पाणी जमिनीपर्यंत वाहून आणण्यासाठी पाइपचा वापर न केल्यामुळे कोसळणार्‍या या पाण्याचे ओसाड थेट काठावरील पोत्यांवर येत होते.

प्रशासकीय यंत्रणेची पाहणी
पाऊस सुरू होण्यापूर्वी बाजार समितीचे प्रशासक नानासाहेब चव्हाण, सचिव दीपक विजयकर, निरीक्षक राजेश इंगोले आदी अधिकारी परिसराची पाहणी करीत होते. त्यादरम्यान पाऊस सुरू झाला.

संबंधित कंत्राटदारासोबत काय करार झाला, याची तपासणी करून कंत्राटदार व आर्किटेक्टला दुरुस्तीबाबत नोटीस बजावणार आहे. येत्या आठ दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना सांगणार आहे. नानासाहेब चव्हाण, प्रशासक, कृउबास.