आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ladies Constable Harassment Issue In Amravati City

महिला पोलिस कर्मचाऱ्याची दोन वरिष्ठां विराेधात छळाची तक्रार, प्रकरण विशाखा समितीकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस आयुक्तालयात कार्यरत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने आयुक्तालयातीलच दाेन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध असभ्य भाषेचा वापर करून लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मंगळवारी विशाखा समितीकडे केली. या गंभीर प्रकाराची दखल घेत विशाखा समितीने चौकशी सुरू केली असून, आगामी दोन ते तीन दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल पोलिस आयुक्तांकडे देणार असल्याचे विशाखा समितीच्या अध्यक्ष पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी बुधवारी सांगितले.
पोलिस मुख्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याने या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी गाडगेनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. यानंतर पाेलिस दलात एकच खळबळ उडाली हाेती.

चौकशी सुरू आहे

याप्रकरणाची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. विशाखा समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे. ‘लैंगिक छळ झाला’ असा शब्द तक्रारीमध्ये नसून ‘डिमांड' असा शब्द तक्रारीमध्ये नमूद आहे. दोन ते तीन दिवसांत चौकशी पूर्ण करून वरिष्ठांकडे अहवाल सोपवण्यात येईल. मोनिकाराऊत, पोलिस उपायुक्त तथा अध्यक्ष विशाखा समिती.

काय आहेत आरोप?

तक्रारदार महिला पोलिस ही मुख्यालयात कार्यरत आहे. तिची गैरहजेरी नोंद करण्यात आली. या प्रकरणात मुख्यालयातील एका अधिकाऱ्याने त्या महिला पोलिसाला वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाण्यास सांगितले. त्यामुळेच ही महिला कर्मचारी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेली होती. या अधिकाऱ्याने त्या महिला पोलिसासोबत असभ्य शब्दांचा वापर केला. त्यामुळेच ही तक्रार करण्यात आली आहे.