आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ladies Jeans News In Marathi, Dressing Styly, Divya Marathi

तरुणींमध्ये बदलला जीन्स पॅन्टचा ट्रेंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी तरुणींना पुन्हा एकदा ‘हट के’ ड्रेसिंग स्टाइल हवीहवीशी वाटू लागली आहे. त्यामुळे आपल्या शरीरावर खुलून दिसणारे रंग आणि आगळ्यावेगळ्या जीन्सची मागणी बाजारात वाढली आहे.

नामांकित कंपन्यांनी तरुणाईची ही नवी मागणी लक्षात घेता, खास करून तरुणींना आकर्षित करण्यासाठी बाजारात विविध जीन्स पॅन्ट आणल्या आहेत. देशभरातील सुमारे 16 कापड निर्मिती कंपन्यांनी ही नवी गरज ओळखत या जीन्स बाजारात आणल्या आहेत. 550 ते 1900 रुपयांदरम्यान असलेल्या या विविधरंगी जीन्स सध्या तरुणींना भुरळ घालत आहेत.

जेगिंग्स
कॉलेज कॅम्पसमध्ये सध्या हा प्रकार लोकप्रिय आहे. युवतीच नाहीत, तर अनेक विवाहित महिलांचीही पसंती या जीन्सला मिळत आहे. समोर उजव्या बाजूला चिल्लर नाणी ठेवायला छोटे पॉकेट असते. बटण आणि इलॅस्टिक. डेनिम आणि कॉटनमध्येदेखील ही जीन्स मिळते.

स्ट्रेचेबल
वजन किंवा चरबीत काही प्रमाणात वाढ झाली, तरी ही जिन्स लगेच कंबरेत घट्ट होत नाही. बहुतांश सडपातळ बांध्याच्या मुली आपली फिगर उठून दिसावी म्हणूनही या प्रकारातील जीन्स वापरतात. माफक दर हे या जीन्सचे वैशिष्ट्य आहे.

अँकल लेंथ
पावलाच्या हाडाच्या किंचित वर असणारी ही जीन्स आहे. टीनएर्जस युवतींमध्ये या जीन्सची मागणी बर्‍यापैकी आहे. फॅशनेबल सॅन्डल्स घातल्यानंतर या जीन्समुळे व्यक्तिमत्त्व आणखी खुलते, असा युवतींचा समज आहे.

टू वे जीन्स
ही जीन्स दोन्ही बाजूंनी घालता येते. त्याची शिलाईची पद्धत हिच या जीन्सचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एका किमतीत दोन जीन्स, अशीही अनेक कंपन्या या जीन्सचे मार्केटिंग करीत आहेत; परंतु या जीन्सची मागणी र्मयादित स्वरूपात आहे.
डेमी
कंबरेचा घेर जास्त असणार्‍या मुली, महिलांसाठी खास करून ही जीन्स तयार करण्यात आली आहे. परंतु ही जीन्स स्ट्रेचेबल नाही. बोटांवर मोजण्याइतक्या कंपन्यांनी या प्रकारातील जीन्स अलीकडेच बाजारात आणली आहे.
स्लाइड बोल्ड
सडपातळ मुली, महिलांसाठी या जीन्सचे डिझाइन खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. शरीराची ठेवण जशी असेल, अगदी त्याप्रमाणे तंतोतंत या जीन्सची फिटिंग येते. ही जीन्सदेखील काही मोजक्याच कंपन्यांनी उपलब्ध केली आहे.
फॅशन बदलाचा परिणाम
अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी नवीन प्रकारच्या जीन्स घातल्याचे दाखवले आहे. त्यामुळे नवीन प्रकारातील या जीन्सलाही अमरावतीत मागणी वाढत आहे. तौसिफ, सीएसई, लिवाइस, अमरावती