आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lakhami Gautam In The First Meeting Of The SDPO Police Station Officer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियमबाह्य वागू नका; कुणापुढे झुकू नका, एसपींनी स्पष्ट केली भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदत्वाचे भान ठेवून नेहमी नियमांनी कामे करा. नियमबाह्य वागू नका आणि कुणापुढेही झुकू नका. नियमांनुसार काम करताना काही अडचण आल्यास घाबरण्याचे कारण नाही. मी सदैव तुमच्या सोबत आहे. मात्र, नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी दिला आहे. अमरावतीमध्ये रुजू झाल्यानंतर गौतम यांनी शुक्रवारी (दि. २९) जिल्ह्यातील सर्व एसडीपीओ ठाणेदारांच्या पहिल्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करून गुन्हेगारीचा आढावा घ
सर्वसामान्यांचे संरक्षण दुर्जनांचे निर्दालन हे पोलिसांचे काम आहे. नागरिकांच्या मदतीनेच पोलिस अधिक चांगले कार्य करू शकतात. ठाण्याच्या हद्दीतील कोणतीही समस्या वा प्रकरण असो; त्या ठिकाणी संबंधित ठाणेदारांनी कमीत कमी वेळात स्वत: पोहोचायलाच पाहिजे. तसे झाल्यास पुढे होणारा उद्रेक आपोआपच थांबतो. त्यामुळे ठाणेदारांनी या बाबीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यासोबतच प्रत्येकच ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘टॉप फाइव्ह’ गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत. या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई करण्याचेही सांगण्यात आले. प्रत्येक ठाण्याच्या
हद्दीतीत वॉन्टेड किंवा पसार असलेले आरोपी तातडीने अटक करण्यात यावेत. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसे झाल्यास तातडीने पोलिस घटनास्थळी पोहोचले पाहिजेत, त्यामुळे वाढणारे प्रकरण त्याच ठिकाणी शांत होईल. ही सर्व जबाबदारी ठाणेदारांची राहणार आहे. प्रत्येक ठाणेदाराकडून ही अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू राहायला नकोत, अशा सौम्य मात्र महत्त्वाच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांना दिल्या. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारीसुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, आजपासून ठाण्यांना भेटी....