आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नामांकनाचा आज शेवटचा दिवशी माजी मंत्र्यासह आजी-माजी आमदारांचे अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - युती आघाडीचे बंध तुटल्यामुळे जिल्‍हाभरात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. परिणामी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारचा बेत काहींनी टाळला. दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार केवलराम काळे, माजी आमदार संजय बंड, राजकुमार पटेल, सुरेखा ठाकरे यांच्यासह इतर दिग्‍गजांचे उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल झाले.
बंड यांच्याशिवाय अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत इतर मतदारसंघांतील दिग्‍गज शुक्रवारी नामांकन दाखल करणार होते; परंतु आघाडीत बिघाडी आणि युतीत फाटाफूट झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळपासून अनेक नवी समीकरणे तयार झाली, ज्याचे प्रतिबिंब शुक्रवारी पहायला मिळाले.

या धामधुमीत माजी आमदार संजय बंड यांनी बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी दाखल केली, तर दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी मोर्शी मतदारसंघातून राकाँचा अर्ज भरला. आमदार केवलराम काळे यांनी मेळघाटात काँग्रेसची आणि माजी आमदार राजकुमार पटेल यांनी राकाँची उमेदवारी घेतली. जिल्‍हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी अचलपूर मतदारसंघात शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. शिवसेनेचे उमेदवार संजय बंड यांनी शुक्रवारी शेकडो समर्थकांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. दुचाकी फेरी लक्षवेधी ठरली.

अमरावतीत कोण ?
अमरावतीमतदारसंघातून पक्षाचे प्रदेश महासचिव डॉ. गणेश खारकर शहराध्यक्ष नितीन हिवसे या दोघांची नावे चर्चेत आहेत. दरम्यानच्या काळात अल्पसंख्याक समाजातील काही जणांनी संपर्क केल्यामुळे पक्षाने अद्याप नाव जाहीर केले नाही. माजी नगरसेवक सलीम बेग युसुफ बेग मेराज खाँ पठाण यांनी या मतदारसंघातून उमेदवारी माग्‍ितल्याची माहिती आहे.

राणाकी बूब?
अनुसूचितजातीसाठी राखीव असलेल्या दर्यापूर मतदारसंघाचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही. आमदार रवि राणा यांच्या अर्धांगिणी लोकसभेच्या राकाँ उमेदवार नवनीत राणा यांनीच तेथे लढावे, असा पक्षादेश असल्याचे जिल्‍हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश बूब यांनीही तिकीट माग्‍ितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.