आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LBT News In Marathi, Amravati Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटी-ऑक्ट्रायला व्यापार्‍यांचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - व्यापार्‍यांचा एलबीटी आणि ऑक्ट्राय या दोन्ही करांना विरोध असल्याची माहिती ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी दिली. एलबीटीविरोधात स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सोमवारी रात्री झालेल्या सभेप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
दोन्ही कर रद्द करून एकस्तर कररचना करण्याच्या मागणीसाठी मुंबईत शुक्रवारी (दि. 21) महासभा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी व्यापारी कुटुंब तसेच 50 लाख व्यापार्‍यांचे प्रतिनिधी तेथे एकत्रित येणार आहेत. राज्यातील 26 पैकी 25 महापालिकेत एलबीटी अपयशी ठरला आहे. इन्स्पेक्टर राज तसेच भ्रष्टाचाराला वाव देणारा एलबीटी रद्द करण्याबाबत संपूर्ण व्यापार्‍यांमध्ये एकमत असल्याचे ते म्हणाले. मागील 36 वर्षांपासून जकातविरोधात व्यापारी संघर्ष करीत आहेत. शासनाने व्हॅट लागू केल्यानंतर पूर्वी 15 हजार कोटी असलेले राज्याचे उत्पन्न आणि 75 हजार कोटींवर पोहोचले. व्यापार्‍यांमध्ये नाराजी असल्याचे गुरुनानी म्हणाले. व्यापारी संघटना कराच्या विरोधात नाही. मात्र, भ्रष्टाचार, इंस्पेक्टर राज वाढवणारे कर नको आहे. कराचा भुर्दंड हा अप्रत्यक्षपणे ग्राहकांवरच पडतो. भ्रष्टाचारमुक्त करप्रणाली आरंभ करण्याची व्यापार्‍यांची मागणी असल्याचे गुरुनानी यांनी सांगितले. या वेळी दीपेन अग्रवाल, कमलेश वोरा, रमेश मंत्री, चेंबर ऑफ अमरावती र्मचन्ट्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी उपस्थित होते. या महासभेचे आयोजन चेंबर ऑफ अमरावती मर्चंट्स अँड इंडस्ट्रीजने केले होते.
एमईडीई समितीच्या शिफारशी लागू करा
करामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी शासनाने गठित केलेल्या एमईडीई समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. माजी अर्थ सचिव सुबोधकुमार सहाय, दिलीप दीक्षित यांचा समितीमध्ये समावेश आहे. समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. परंतु, शासन त्यावर निर्णय घेण्यास तयार नाही, असेही त्यांनी सांगितले.
भाजप, आपचे सर्मथन
भाजप, आम आदमी पार्टीने सर्मथन दिले आहे. ज्या राजकीय पक्षाकडून सर्मथन मिळेल किंवा जो पक्ष सत्तेत आल्यानंतर ऑक्ट्राय आणि एलबीटी हटवण्याचे आश्वासन देईल, त्याच राजकीय पक्षाला सर्मथन मिळणार असल्याचे मोहन गुरुनानी यांनी सांगितले.