आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत ३०० दुकानांची तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापािलका एलबीटी विभागाने तीन दिवसांमध्ये तब्बल ३०० दुकानांची तपासणी केली. एलबीटी नोंदणी व कराचा भरना न करणाऱ्या माय चॉइस व बॉम्बे स्टील सेंटर, या दोन दुकानांना सील ठोकण्यात आले.
बॉम्बे स्टीलने अद्यापही एलबीटी नोंदणी केली नव्हती, तर माय चाॅईस, या व्यापारी प्रतिष्ठानाने मागील डिसेंबर महिन्यापासून एलबीटीचा भरणा केला नव्हता. त्यामुळे, स्थानीय संस्था कर नियम २०१० नुसार जप्तीची कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांकडून एलबीटी भरण्याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी प्रतिष्ठानांची तपासणी करण्याचे आदेश fnले. भरणा टाळणाऱ्या दुकानांची यादी तयार करण्यात आली आहे. उपायुक्त विनायक औगड यांच्या मार्गदर्शनात एलबीटी अधिकारी योगेश पीठे, मदन तांबेकर, यांच्या नेतृत्वात मुख्य निरीक्षक सुनील पकडे, सहायक अधीक्षक श्रीराम आगासे, निरीक्षक राजू वाठोडकर, सुभाष विधाते, दुर्गादास मिसाळ, कमल देसाई, रितेश देसाई, रुपेश गोलाईत, रविंद्र चांडोळे, प्रशांत राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.