आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटीनंतर पालिकेचे टार्गेट मालमत्ता कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेतर्फे शनिवारपासून (दि. २०) बडनेरा प्रभागात िशबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रभागांतर्गत साईनगर, कंवरनगर, नवाथे नगर परिसरात शनिवार रविवारी मालमत्ता कर वसुली शिबिर घेण्यात येणार आहेत. मालमत्ता धारकांना िडमांड नोटीस पाठवण्यात आली असून, बडनेरा प्रभागात एक एप्रिलपासून १० सप्टेंबरदरम्यान एक कोटी ४० लाख रुपयांचा मालमत्ता कर गोळा झाला आहे. एलबीटीनंतर पालिकेस मालमत्ता करातून उत्पन्नाची अपेक्षा आहे.

व्याजाची तरतूद
डिमांडनोटीसनंतर तीन महिन्यांत करभरणा आवश्यक आहे; अन्यथा व्याज आकारण्यात येणार आहे. प्रलंिबत करावर वार्षिक २४ टक्के व्याजदर आकारण्याची तरतूद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या ठिकाणी होणार शिबिर
वार्ड दविस दिनांक स्थळ
५९शनिवार रविवार २० २१ सप्टें. प्रिमी फुड्स, कंवरनगर चौक
६० रविवार २१ सप्टें. सद््गुरू कोचिंग क्लासेस, गणेशनगर
६१ रविवार २१ सप्टें. प्रभादेवी मंगल कार्यालय
६३ शनिवार रविवार २० २१ सप्टें. प्रिमी फुड्स, कंवरनगर चौक
६४ शनिवार रविवार २० २१ सप्टें. प्रिमी फुड्स, कंवरनगर चौक
६७ रविवार २१ सप्टें. डॉ. काळबांडे हॉस्पिटल, नवाथेनगर
६८ रविवार २१ सप्टें. भक्तिधाम मंदिर, बडनेरा रोड
७० रविवार २१ सप्टें. मूकबधिर विद्यालयजवळ, अकोली रोड