आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी रद्द न केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीला धडा शिकवू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महानगरपालिकेमधील स्थानिक संस्था कर रद्द न केल्यास आगमी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला धडा शिकवू, असा इशारा शहरातील व्यापार्‍यांनी शनिवारी दिला. चेम्बर ऑफ अमरावती महानगर र्मचंट्स अँड इंडस्ट्रीजने केमिस्ट भवन येथे पत्रपरिषद घेतली. या वेळी आघाडी सराकारला ताकीद देण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष सुरेश जैन, बकुल कक्कड, घनश्याम राठी, अशोक राठी, अशोक मंत्री, मगन बांठिया, अशोक मंत्री, सुरेश बत्रा, अर्जुन चांदवाणी आदी पत्रपरिषदेस उपस्थित होते. केंद्रात मोदी सरकार आल्याने व्यापार्‍यांना अनेक मार्ग खुले झाल्याचा सूचक इशाराही या वेळी देण्यात आला.
राज्यस्तरावरील ‘फॅम’या व्यापारी संघटनेच्या सहकार्याने महानगर चेंबरने एलबीटीविरोधात लढा सुरू केला आहे. राज्यातील 25 महानगरपालिकांमध्ये एलबीटी आणि एका महानगरपालिकेत जकात कर आकारण्यात येतो. व्यापार्‍यांच्या विरोधानंतर राज्य सरकारने सुबोध कुमार समिती स्थापन करून एलबीटी आणि जकात कराबाबत विस्तृत अहवाल मागवला होता. त्या अहवालाच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या नाहीत, असा आरोपही व्यापार्‍यांनी केला. राज्यातील तत्कालीन शिवसेना-भाजप युती शासनाने नगरपालिका क्षेत्रातून जकात कर हद्दपार केला होता. तेव्हा अन्य कोणत्याही प्रकारचा कर लादला नव्हता. त्यामुळे जकात आणि एलबीटी यापैकी कोणताही एक कर ठेवा, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली.
येत्या पंधरा दिवसांत सरकारने एलबीटी रद्द न केल्यास कोणत्याही साहित्यावर फक्त दहा रुपये कर भरण्याचे अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याचे चेम्बर ऑफ अमरावती महानगर र्मचंट्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी सांगितले.