आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard News In Marathi, Asola, Yavatmal, Vidarbha, Divya Marathi

आसोला बिटमध्ये पुन्हा आढळला बिबट्याचा मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - गेल्या महिनाभरापूर्वी नेर वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याची घटना ताजी असताना याच वनपरिक्षेत्रात आणखी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना आसोला बीट परिसरात आसोला गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलात बुधवारी सकाळी उघडकीस आली.


गेल्या काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यात बिबट्यांच्या मृत्युच्या अनेक घटना घडल्या आहेत. या संदर्भात वन विभागाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी बिबट्यांच्या मृत्युच्या घटनांवर आळा घालणे शक्य झालेले नाही. त्यातच नेर वनपरिक्षेत्रातील आसोला गावानजीक आज 26 मार्च रोजी सकाळी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताचा वन विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी बिबट्याचा मृतदेह चार ते पाच दिवसांपासून त्या ठिकाणी पडून असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पंचनामा करुन बिबट्याच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दहा वष्रे वयाच्या बिबट्याचा वृद्धापकाळान मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी वनविभागाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. आज बिबट्याचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आले ते ठिकाण यवतमाळ वनपरिक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र बिबट्याच्या मृत्युच्या घटनेने वनविभागालाही चांगलेच काळजीत पाडले आहे.