आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरावर दोन दिवस जलसंकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बुधवार व गुरुवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना दोन दिवस जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हे स्पष्ट केले.

विमवि परिसरातील जलकुंभाच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती बुधवारपासून (दि. 2) केली जाणार आहे. त्यासाठी एक दिवस लागणार असल्याचे मजीप्रा अधिका-यांनी सांगितले. दुरुस्तीचे काम वाढल्यास सावधगिरी म्हणून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. दुरुस्ती कामामुळे कठोरा नाका, विद्युतनगर, विमवि परिसर, उज्ज्वल कॉलनी, रंगोली लॉन परिसर, फ्रेन्ड्स कॉलनी, नवसारी, विलासनगर, लक्ष्मीनगर, राठीनगर, गाडगेनगर, रामपुरी कॅम्प, पॅराडाइज कॉलनी, नूरनगर, गुलिस्तानगर, हबीबनगर, जमील कॉलनी, चांदणी चौक, पठाण चौक, पटवीपुरा, सातखिराडी, लालखडी, जवाहर गेटच्या आतील भागाला पाणी मिळणार नाही. मात्र, बडनेरा, सातुर्णा, स्वस्तिक नगर, कॅम्प यासह विविध भागांतील पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याचे मजीप्राने स्पष्ट केले आहे.
फोटो - डमी पिक