आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास हजार लोकांचे ‘समृद्धीचे स्वप्न’ टांगणीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातीलपहिली ‘लिफ्ट’इरिगेशन योजना गुरुकुंज मोझरी येथे सहा वर्षांपूर्वी मंजूर होऊनही अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. योजना पूर्णत्वास गेल्यास परिसरातील पंधरा गावांचे सात हजार १०९ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाचे पर्यायाने पन्नास हजार नागरिकांच्या समृद्धीचे स्वप्न साकार होणार आहे. तीन वर्षांपूर्वी (२०११) कार्यारंभ आदेश निघून २०१५ पर्यंत २१२ कोटींच्या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र,जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांचा जीवनामध्ये बदल घडवून आणणारी ही महत्त्वाकांक्षी योजना तांत्रिकतेमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.
या उपसा सिंचन योजनेला १३ जुलै २००९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. पहिल्या टप्प्याच्या निविदा मंजूर झाल्या. निधी मंजूर होऊन सुमारे तीन वर्षांपूर्वी कार्यारंभ आदेश निगर्मित झाले. त्यामुळे आतापर्यंतकिमान पहिल्या टप्प्याला सुरुवात होऊन तो पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांचे दुदैव म्हणा, की आणखी काही; अजूनही ही योजना नकाशावरच सिंचन करत आहे. अप्परवर्धा धरणाच्या उजव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा उपसा करून (लिफ्ट) गुरुकुंज टेकडीवरील प्रस्तावित पंपगृहामधून ते आणण्याचे नियोजन आहे. तेथील उंचीवरून विजेचा वापर करता परिसरामधील पंधरा गावांतील सात हजार १०९ हेक्टरमधील शेतीला सिंचनासाठी पाणी पोहोचवण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.
लवकरच प्राप्त होणार पंपगृहाचे संकल्पचित्र
-आमच्यास्तरावर सर्व कामे मार्गी लावली आहेत. नाशिक येथून पंपगृहाचे संकल्पचित्र मागितले आहे.डिसेंबरच्या अखेरपर्यंत ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तातडीने कामास सुरुवात होणार आहे. पाच किलोमीटर लांबीचे पाइपसुद्धा आणले आहेत. पी.पी. पोटफोडे, उपविभागीयअभियंता.

जानेवारी २०१५ पर्यंत होणार कामास सुरुवात
सद्य:स्थितीमध्येसात कोटी २३ लाख रुपयांचे पाइप आणले आहेत. पंपगृहाची उभारणी करून हे पाइप टाकण्याचे काम जानेवारी २०१५ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मार्च २०१५ पर्यंत लाभक्षेत्राचे सखोल सर्वेक्षण पूर्ण होणार आहे, असे प्रकल्पाचे शाखा अभियंता एस. टी. वानरे यांनी सांगितले.