आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liquor News In Marathi, Maharashtra, Madhya Pradesh, Divya Marathi

महाराष्ट्राच्या बाटलीत मध्य प्रदेशचे मद्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मध्य प्रदेशातील स्वस्त मद्य महाराष्ट्रातील महागड्या बाटल्यांमध्ये भरून ते बाजारभावाप्रमाणे विकण्याचा वर्धा शहरातील गोरखधंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अमरावती येथील पथकाने रविवारी उघडकीस आणला. याप्रकरणी एक लाख 84 हजार रुपयांच्या मद्यासह एका आरोपीला अटक करण्यात आली.


पीयूष शहा (42 रा. म्हाडा कॉलनी, रिंगरोड, वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. तो राजेश जयस्वाल यांच्या मालकीच्या घरात राहत होता. म्हाडा कॉलनीतील याच घरातून पीयूष आणि राजेश मद्याची तस्करी करत करत होते. उत्पादन शुल्क विभागाचे पथक शनिवारी रात्री वध्रेत दाखल झाले. त्यांनी राजेश जयस्वाल यांच्या घरी धाड टाकली. या वेळी पीयूष घरात होता. मात्र, अधिकार्‍यांना मद्य दिसले नाही. चौकशीअंती त्यानेच मद्याचा अड्डा दाखवला. तो पाहून पथकाला धक्काच बसला. जयस्वालच्या घरात भिंतीमध्ये ओळखू येणार नाही असे दार होते. दाराच्या मागे 10 बाय 8 या आकाराची खोली होती. या खोलीत मद्याचे बॉक्स ठेवले होते.


कारवाईदरम्यान पथकाने विदेशी मद्याचे 56 बॉक्स जप्त केले. यामध्ये एक लाख 15 हजारांचे महाराष्ट्रात निर्मित, तर 27 हजार 300 रुपयांचे मध्य प्रदेशात निर्मित मद्य आणि अन्य साहित्य असे एकूण एक लाख 84 हजार 371 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. मद्याच्या रिकाम्या बॉटल, झाकणे, सीलिंग मशीन आदी साहित्यही ताब्यात घेण्यात आले. याच वेळी राजेश जयस्वाल फरार झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
ही कारवाई विभागीय उपायुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कोकाटे, अमरावतीचे उपअधीक्षक युवराज राठोड, एस. जी. बेदरकर, एस. जी. ठाकूर, आर. एस. राऊतकर, विठ्ठल काष्टे, मारुती सुरनाथ यांनी केली.


दोन वाहनांसह पावणेनऊ लाख रुपयांची दारू जप्त
एक मार्च ते 6 एप्रिल या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्हाभर 120 जणांविरुद्ध कारवाई करून पावणेनऊ लाखांची गावठी, अवैध दारू व दोन वाहने जप्त केली आहेत. याच वेळी 56 आरोपींना अटक करण्यात आली.


अशी होत असे विक्री
मध्य प्रदेशातील दारूची अमरावतीमार्गे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वध्रेत कारवाई केली. आरोपींकडे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील दारू मिळाली. आरोपी मध्य प्रदेशातील दारू महाराष्ट्राच्या बॉटलमध्ये भरून विकत होते. युवराज राठोड, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अमरावती.