आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liquor Party News In Marathi, Divya Marathi, Amravati

खुलेआम दारू पार्टी, पोलिसांची भीती नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कोणत्याही शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात गुटखा, तंबाखू, सिगारेट, दारू विक्रीला कायद्याने बंदी आहे. मात्र, राजापेठ परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथी कॉलेज नजीकच्या एका पानटपरीवर शुक्रवारी रात्री जाम छलकताना आढळले. चार अज्ञात लोकांमध्ये ही ‘ओली पार्टी’ भर रस्त्यावरच रंगली. हे चार अज्ञात कोण, हे ‘दिव्य मराठी’ला ठाऊक नाही. पण, या मार्गावर गल्र्स हॉस्टेल असून, येथे नेहमीच अशा सार्वजनिक ठिकाणी ‘ओल्या पाटर्य़ा’ रंगतात, अशा अनेक तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारच्या रात्री आढावा घेतला असता, हे भयानक ‘वास्तव’ सामोरे आले.


तखतमल कॉलेजच्या नजीकच एक पानटपरी आहे. या टपरीवर गुटखा, पानमसाला, सिगारेट बंदी असतानाही विकली जात होती. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात गुटखा, पानमसाला बंदीचा नियम पानटपरीवाल्याने मोडला, यात काहीच शंका नाही. आता दुसर्‍या नियमाबद्दल बोलूया. शाळेच्या परिसराजवळ दारूविक्रीही करता येत नाही. परंतु, जेमतेम साडेनऊच्या सुमारास याच पानटपरीवर आलेल्या काही जणांनी चक्क ‘ओली पार्टी’ सुरू केली. जवळच असलेल्या वाइन शॉपमधून दारूच्या बाटल्या आणायच्या आणि त्या पानटपरीवरच उभे राहून प्यायच्या, असा क्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. आश्चर्य म्हणजे, ‘दिव्य मराठी’चे हे स्टिंग ऑपरेशन सुरू असताना याच पानटपरीपुढून तीनदा राजापेठ पोलिसांचे वाहन गेले.


चिमुकलीजवळ नेली दारू : दारूच्या नशेत असलेल्या एकाने तहानेने व्याकूळ झालेल्या एका चिमुकलीच्या तोंडाजवळ चक्क दारूने भरलेला प्लास्टिकचा ग्लास नेल्याचा संतापजनक प्रकारही या वेळी घडला. अत्यंत शिवराळ भाषेत तो या चिमुकल्या बालिकेला ‘पाणी काय पिते, दारू पी’, असे दर्पोक्तीने सांगत होता. ही चिमुकली कुणाची होती, हे कळले नाही.


तातडीने कारवाई करणार
हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्याची तातडीने दखल घेतली जाईल. ज्या पानटपरीवर ही ‘ओली पार्टी’ रंगली, त्या मालकाविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. बी. के. गावराणे, पोलिस उपायुक्त