आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाथेतील दारू दुकान होणार स्थलांतरित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नवाथेपरिसरातील देशी दारूचे दुकान आगामी दोन आठवड्यांत स्थलांतरित होण्याची चिन्हे आहेत. शाळेजवळच हे दारूचे दुकान असल्याने कारवाई अटळ असल्याचे संकेत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शनिवारी दिलेत.
वडाळी परिसरातील दारूचे दुकान स्थलांतरित झाल्यानंतर लगेचच नवाथे येथील देशी दारूचे दुकान हटवण्याची मागणी पुढे आली होती. परिसरात असलेल्या शाळेपासून अवघ्या काही मीटर अंतरावरच हे दुकान आहे. त्यामुळे ते हटवण्याची मागणी नागरिकांनी केली होती. परंतु, त्यासाठी वडाळीतील किंवा नवसारीतील महिलांप्रमाणे कोणतेही उग्र आंदोलन कुणी केले नव्हते. वडाळीतील दुकान हटवण्यासाठी महिलांनी उग्र आंदोलन केले. त्यानंतर नवसारीतील दुकान हटवण्यासाठी महिलांनी जिल्हाधिका-यांचे वाहन रोखून धरले होते. मात्र, नवाथेच्या मुद्द्यावरील पहिले निवेदन प्राप्त होताच जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी तातडीने नियमाचा आधार घेतला. संबंधित दुकान शाळेपासून अगदी जवळ असल्याने ते नियमानुसार हटवावे लागेल, यावर गित्ते ठाम झालेत. त्यामुळे त्यांनी त्या अनुषंगाने कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय यंत्रणेने कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे आगामी दोन आठवड्यांत नवाथे परिसरातील दारू दुकान हटवण्याची कारवाई पूर्ण होण्याचे संकेत आहेत. वडाळीतील दारू दुकानाचा लढा यशस्वी झाल्यानंतर आता आणखी एका दारू दुकानावर कारवाई होणार असल्याचे दिसून येत आहे.

नियमानुसारच दुकान हटवणार
दारूदुकानाला परवाना देण्यासाठी जसे अनेक नियम आहेत; तसेच नियम दारू दुकान हटवण्यासाठीही आहेत. परंतु, नवाथेतील दुकान शाळेजवळच असल्याने ते लवकरच हटवण्यात येणार आहे. त्याबाबत सूचना दिल्या आहेत. किरणगित्ते, जिल्हाधिकारी