आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Literature Conference, Latest News In Divya Marathi

साहित्यातून प्रेरक ऊर्जा मिळावी- दिग्दर्शक राजदत्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - स्वातंत्र्योत्तर काळात आपण मनाने स्वतंत्र झालो आहोत का? देशप्रेम वाढले का? मातृभक्ती वाढली का? की मनुष्य स्वत:चा विचार करायला लागला आहे? याचा विचार करण्याची आज गरज आहे. त्यासाठी नव्या पिढीला साहित्यातून प्रेरक ऊर्जा मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, विचारवंत राजदत्त यांनी शनिवारी केले. राज्यस्तरीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ते बोलत होते.
राजदत्त म्हणाले, सावरकर साहित्याची दिंडी निघाली. त्यातील पुस्तके आणि विचार नवीन पिढीने अवश्य वाचावे. पण वाचले म्हणजे कार्य आणि तसे ध्येय पूर्ण होते, त्यानुसार आपण चालतो आहोत असे नाही. तसेच नवीन पिढीला याद्वारे काही ऊर्जा मिळते आहे का, त्यांची पावले अधिक सशक्तपणे पडत आहेत का, हा महत्त्वाचा भाग आहे. सावरकर चरित्राचे गाढे अभ्यासक सच्चिदानंद शेवडे यांनी आजच्या भरकटलेल्या पिढीच्या अज्ञानावर चिंता व्यक्त करत योग्य इतिहास युवा पिढीपुढे मांडला जात नसल्याची खंत व्यक्त केली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, सुरेश शिंदे पाटील, भाऊ सुरडकर, राहुल ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. रविवारी सायंकाळी समारोप होणार आहे. या वेळी अकोल्याचे धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ यांना सावरकर जीवनव्रती सन्मानाने गौरवण्यात येईल. सायंकाळी सातला राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर उपासनी यांचे संगीतमय कीर्तन होणार आहे.
आज परिसंवाद, एकपात्री, व्याख्यान
रविवारी सकाळी नऊला ‘सावरकरांचे सैनिकीकरण व राष्ट्रीय सुरक्षा’ आणि ‘सावरकरांचे सामाजिक क्रांतिकार्य’ या विषयांवर परिसंवाद होणार आहे. दुपारी दोन वाजता ‘स्वा.सावरकर आणि महिला विश्व’ कार्यक्रमात ‘सावरकरांच्या जीवनसाहित्यातील स्त्री व्यक्तिरेखा’ विषयावर व्याख्यान होणार आहे. ‘मी येसुवहिनी बोलतेय’ या एकपात्री प्रयोगानंतर दुपारी साडेतीनला ‘सावरकरांचे साहित्य’ विषयावर परिसंवाद होणार आहे.