आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यव्यापी "शाळाबंद'ला अल्प प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अतिरिक्तशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा अनुदानाच्या मुद्द्यांवरून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक संस्थाचालकांच्या संघटनांनी शुक्रवारी (दि. १२) संयुक्तपणे पुकारलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ६२९ माध्यमिक शाळांपैकी केवळ ९५ शाळाच बंद होत्या, अशी मािहती माध्यमिक शिक्षणाधिकारी सी. एच. राठोड यांनी दिली. शहरातील बहुतांश शाळा नियमितपणे सुरू होत्या. शिक्षण विभागाकडून सायंकाळपर्यंत बंदबाबत अहवाल संकलन सुरू होते.
शिक्षक संघटनांनी आंदोलनात सहभागाबाबत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. शहरातील एक-दाेन शाळांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व शाळा सुरळीत सुरू होत्या, असे शालेयविद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस संघटनेच्या चालकांनी सांिगतले. यासंदर्भात दुपारपर्यंत माध्यमिक शिक्षण विभागाला कोणताही अहवाल प्राप्त झालेला नव्हता. दरम्यान, प्राथमिक शाळांवर शुक्रवारच्या बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही, त्यासंदर्भातील निवेदनही प्राप्त झाले नाही, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.
चिखलदरा तालुक्यात बहुतेक शाळा बंद
-चिखलदरातालुक्यात राज्यव्यापी बंदला जोरदार प्रतिसाद लाभला आहे. तालुक्यातील बहुतेक शाळा बंद आहेत. माध्यमिक शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गाेलूमंुडे, चिखलदरा,तालुकाध्यक्ष, शि.आ.
९५शाळा आहेत बंद
-अमरावतीग्रामीण विभाग सर्व तालुक्यांमधून ६२९ माध्यमिक शाळांपैकी ९५ शाळा बंद असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, शहरातील शाळांबाबतची आकडेवारी माझ्याकडे अजूनपर्यंत (दु. २. ३० वा.) आलेले नाही. सी.आर. राठोड, माध्यमिकशिक्षणाधिकारी