आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती - मराठी माध्यमातील शाळांप्रति पालक, विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन उदासीन आहे. त्यातल्या त्यात जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळेत मुलाचे नाव घालायचे म्हटले, की नाकं मुरडली जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील मुलांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडील काही जुजबी माहिती शिकवली जाते काय, याची चाचपणी करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या चमूने शहरातील बहुतांश मराठी, हिंदी, उर्दू महापालिका शाळा, कन्या विद्यालयांना भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांना शहराबद्दलही जुजबी माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. त्याचा हा लेखाजोखा.
विद्यार्थिनी निरुत्तर
या शाळांना भेटी
मनपा हिंदी बॉईज माध्यमिक विद्यालय
मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्यालय
मराठी मुलांची शाळा (बुधवारा)
उर्दू शाळा (नागपुरी गेट)
मनपा शाळा (बडनेरा दस्तुरनगर, रुक्मिणीनगर, नवसारी, विलासनगर, शेगाव नाका, चपराशीपुरा, बेलपुरा)
दोन खासगी कॉन्व्हेंट
असा निघाला निष्कर्ष
बहुतांश विद्यार्थ्यांना महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याबद्दल माहीतच नाही.
एकाही विद्यार्थ्याने महापालिका पाहिलेली नाही. आमसभा, स्थायी समिती काय असते, मनपाचे कामकाज कसे चालते, हे त्यांना माहीतच नाही.
बहुतांश शाळांच्या सहली गेलेल्या नाहीत. त्यांना वीज कशी तयार होते, पाणी शुद्धीकरण कसे होते, धरण कसे असते, रेल्वे कशी धावते, वृत्तपत्रांची कामे कशी चालतात, हे ठाऊक नाही.
विद्यार्थ्यांना देण्यात येते सामान्य ज्ञान
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक माहिती देण्यात येते. त्यांना सामान्य ज्ञानाचे धडेही देण्यात येतात. दैनंदिन तासिकांमध्येच या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. अर्चना राजगुरे, शिक्षण सभापती, महापालिका
कॉन्व्हेंटमधील परिस्थिती काहीशी ‘हट के’
बहुतांश विद्यार्थ्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, महापौर, आमदार, खासदार, माजी राष्ट्रपती, जिल्हाधिकारी आदी माहिती तोंडपाठ होती. शिवाय सामान्य ज्ञान (जीके), परिसराची माहितीही बर्यापैकी होती. यावरून पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडेही विद्यार्थी किती सजग आहेत व त्यांना किती शिकवले जाते, याची कल्पना येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.