आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीरावांच्या पुत्रप्रेमामुळे आमचा झाला घात - देवानंद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या पुत्रप्रेमामुळेच माझा घात झाला आहे. मला प्रथम तांडावस्तीच्या अध्यक्षपदावरून काढले. आता जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी केली. काँग्रेसमधील दुय्यम फळीतील पदाधिकार्‍यांनी पक्षातील काही अनिष्ट गोष्टींविरोधात आवाज उठवला होता. नेते मात्र सुडाच्या भावनेने वागत असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी केला आहे. गटनेतेपदावरून काढल्यानंतर यवतमाळात पत्रकार परिषदेत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
काँग्रेसमधील दुय्यम फळीतील पदाधिकार्‍यांनी आपल्याच पक्षातील काही निर्णयाच्या विरोधात बंड पुकारले होते. दरम्यान, कॉग्रेसच्या नेत्यांनी मात्र पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांचे खच्चीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. आता जिल्हा परीषदेच्या गटनेते पदावरुन देवानंद पवार यांना काढल्याने कॉग्रेसचे अनेक पदाधिकारी संताप व्यक्त करीत आहे. शेतकर्‍यांच्या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी घाटंजी येथे नुकताच मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे काँग्रेसचे नेते संतापले आहे. या मोर्चात आम्ही सुद्धा सहभागी झालो होतो .आमच्यावरसुद्धा सूड कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे घाटंजी तालुका अध्यक्ष शैलेष इंगोले, शहर अध्यक्ष सय्यद रफीक, रमेश आंबेकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, संजय निखडे पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी केली आहे. एकंदरीत कॉग्रेस मध्ये सुरु असलेले गृहयुध्द आता चांगलेच रंगात आले आहे. अडीच महिण्यावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुका बघता या घटनांचे विपरीत पडसाद पक्षावर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

माणिकरावांच्या आदेशाला खो
येणार्‍या विधानसभा निवडणुका बघता देवानंद पवार यांच्यावरील कारवाई न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर नगर परिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती च्या पदाधिकार्‍यांवर कारवाई करायची असल्यास प्रस्ताव तयार करुन प्रदेश कमेटीकडे पाठवावा लागतो. यवतमाळात मात्र प्रदेशाध्यक्षांच्या आदेशालासुद्धा जिल्ह्यातील नेते महत्व देत नसल्याचे अनेक घटनांवरुन स्पष्ट झाले आहे.
एकट्यालाच केले टार्गेट
काँग्रेसमधील दुय्यम फळीतील जवळपास पंचविस ते तीस पदाधिकार्‍यांनी बंड केले होते. मात्र शिवाजीराव मोघे यांनी एकट्या देवानंद पवार यांना टार्गेट केले आहे. आता इतर पदाधिकार्‍यांच्या विरोधात अशीच कारवाई होण्याची शक्यता असल्याने इतरही पदाधिकारी द्विधामनस्थितीत आहे. आता हे पदाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेत्यांवरही कारवाई करा
काँग्रेस आमदार हरीभाऊ राठोड यांनी शिवाजीराव मोघे तसेच वसंतराव पुरके यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनीसुद्धा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केले आहे. मोघे तसेच पुरके हे दोन्ही नेते घटनादत्त पदावरुन एका विशिष्ट समाजासाठी आंदोलन करीत आहेत. आता या नेत्यांवर सुद्धा पक्ष कारवाई करेल काय असा प्रश्न देवानंद पवार यांनी उपस्थित केला आहे.
शिवाजीरावांचे पुत्र नेते कसे?
आमचे नेते शिवाजीराव मोघे आहेत. त्यांचे पुत्र आमचे नेते कसे होऊ शकतात? त्यांना आम्ही उज्ज्वल भविष्यासाठी मदत केली असती. मात्र विरोधकांशी हात मिळवणी करून आमच्या खच्च्ीकरणाचा प्रय} खपवून न घेतल्याने आमच्यावर सूड उगवला जात आहे.
देवानंद पवार, सदस्य, जिल्हा परिषद, यवतमाळ.