आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भार' नि‘यम’नाने सर्किट शॉट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्ह्यात पावसाच्या दगाबाजीने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यातही बागायती पट्ट्यात सोयाबीन, कपाशी, संत्रा बहारदार आहे. परंतु आता ही पिके केवळ उपलब्ध होणाऱ्या विजेवरच अवलंबून आहेत. सध्या केवळ आठ तास वीज उपलब्ध होत असल्यामुळे एकाच वेळी सर्व पिके पाण्यावर आल्याने सिंचन करणे जिकिरीचे झाले आहे. वन्यप्राणी, जीवघेण्या सहा-सहा फुटांच्या नागांवर मात करून पिके जगवण्याची लढाई शेतकरी लढत आहेत.
जिल्ह्यात कृषिपंपांसाठी कुठे तीन दिवस, तर कुठे चार दिवस दिवसा वीज तर उर्वरित दिवशी रात्री आठ तास वीज उपलब्ध करून दिली जाते. परंतु लोंबकळलेल्या वीज तारा, वाकलेले खांब, तारांमध्ये पडणाऱ्या आळ्या, हवा आली, की वीज जाणे आदी भीषण समस्यांमुळे शेतकऱ्यांना सलग धड आठ तासही वीज उपलब्ध होत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. दुबार, तिबार पेरण्या करून बागायत पट्ट्यात पिके समाधानकारक आहेत. सध्या सोयाबीन फुलोराच्या अवस्थेत आहे. पेरण्या उशिरा झाल्यामुळे सोयाबीनचे पीक पावसाच्या ताणामुळे लवकरच फुलोऱ्यावर आल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाअभावी कोट्यवधी रुपयांच्या संत्र्याला गळण लागली आहे. पूर्व मान्सून कपाशी फळधारणेच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेत केवळ आठ तास वीज मिळत असल्यामुळे पिके जगवावी तरी कशी, अशी भीषण चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वीज उपलब्ध होऊन पिकांना पाणी मिळाल्यास सोयाबीन नाही पिकले तर कपाशी पिकेल; दोन्ही नाही पिकले तर संत्रा तरी पिकेल, अशी आस बागायत पट्ट्यातील शेतकऱ्यांना लागून आहे.
आठतासांत केवळ दहा गुंठे ओलीत
सलगआठ तास वीज मिळाल्यास विहिरीतील पाण्याची पंपाची पाच अश्वशक्तीची क्षमता, तुषार सिंचनाचा संच उपलब्ध असल्यास एका दिवशी अंदाजे केवळ दहा गुंठे ओलीत समाधानकारक होऊ शकते. त्यामुळे एका एकराच्या सिंचनासाठी किमान चार दिवस लागतात. सध्या जमिनीला तडे गेल्यामुळे सोयाबीन कपाशीला संपूर्ण आठ तासांच्या तुषार सिंचनाच्या आठ तासांच्या टप्प्याची गरज आहे. संत्र्यालाही मुबलक पाणी आवश्यक आहे; परंतु मिळणाऱ्या विजेच्या कालावधीत समाधानकारक सिंचन करून पिके जगवणे जिकिरीचे झाले आहे.
कडकउन्हामुळे संकट गहिरे
दिवसाकडक ऊन तापत असल्यामुळे आठ तासांच्या सिंचनाने दिलेले निम्मे पाणी सायंकाळी दुसऱ्या दिवशी उडून जाते. त्यामुळे ;आठ तासांचे सिंचनही पिकांना कमी पडत आहे. त्यामुळे कडक ऊन भारनियमनामुळे पिकांचे संकट गहिरे झाले आहे.
रात्रीचीएका तासाची मजुरी २०० रुपये
बागायतपट्ट्यात सध्या सोयाबीन गुडघाभर वाढले आहे. सिंचन असलेल्या चांदुर बाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नाग सापांचा सुळसुळाट झाला आहे. चांदुर बाजार तालुक्यात पूर्णा प्रकल्पाच्या कालव्यामुळे सापांची संख्या सर्वाधिक असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे रात्री शेतात जाण्यासाठी सहसा कुणीही धजावत नाही. अशा जीवघेण्या स्थितीत सिंचनाचा टप्पा बदलवण्यासाठी एक तासाचा वेळा लागतो. यासाठी २०० रुपये मजुरी मोजावी लागते. दरम्यान, सध्या शेतीच्या कामाची दिवसाची मजुरी अंदाजे १५० ते २०० रुपये आहे.

कुठे गेली चोवीस तास वीज?
पाचवर्षांपूर्वी नेत्यांनी २०१२ पर्यंत चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. परंतु पाच वर्षांनंतरही चोवीस तास दूर; पण दिवसा बारा तासही वीज मिळणे कठीण झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, कुठे गेल्या नेत्यांच्या घोषणा, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
नगदी पीक संत्रा सर्वाधिक अडचणीत
पावसाअभावीमृग बहाराच्या संत्र्याचे नुकसान झाले असताना आंबिया बहार चांगला असूनही मोठ्या प्रमाणात संत्र्याची फळे गळून पडत आहेत. यात इतर मुबलक पाण्याची गरज असून, भारनिमयमनामुळे पाणी देऊन कोट्यवधीचे नुकसान टाळणे कठीण झाले आहे.
पावसाअभावी कोरडवाहूचा डोलारा ‘रामभरोसे’ आहे. पाऊस आला, तर दाणे पिकतील; अन्यथा सुपडा साफ. बागायती पट्ट्यात पिकं चांगली आहेत. फक्त ती जगवण्यासाठी काही दिवस चोवीस तास विजेची गरज आहे. पाणी मुबलक असूनही केवळ भारनियमानामुळे पिकं जगवणं जिकिरीचे झाले आहे. सापाच्या फण्यावर पाय ठेवून रात्रंदिवस ओलिताची धडपड सुरू आहे. शेती उभी करण्यासाठी काढलेलं कर्ज फिटेल की नाही, या चिंतेचा भार डोक्यावर वाहत असताना भारनियमनाचा ‘यम’ मात्र पिकांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे बागायत पट्ट्यातील आर्थिक सर्किटच ‘शॉट’ होण्याची गंभीर भीती निर्माण झाली आहे. एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या या उद्योगाला वीज उपलब्ध करून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही मूग गिळल्यामुळे ग्रामीण भागात संतापाची लाट आहे.

वरिष्ठ पातळीवरूनच होतो वीजपुरवठा खंडित
नियमानुसारआठ तासांचे भारनियमन आहे. त्यातही तांत्रिक बिघाडामुळे वीज गुल राहण्याची शक्यता आहे. काही वेळेला वरिष्ठ पातळीवरूनच वीजपुरवठा खंडित असतो. याची आम्हालाही माहिती नसते. संजयखाटके, उपविभागीयअभियंता, मोर्शी विभाग
हवे तेवढे पैसे घ्या...
वीजकंपनीने हवे तेवढे पैसे घ्यावे; पण वीज चोवीस तास उपलब्ध करून द्यावी. पुरेशी वीजच मिळत नसल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. विलासजाने, चमक,ता. अचलपूर
भरुन निघणारे नुकसान
सहाएकरांत केळी, कोबी, भाजीपाला पीक आहे. यावर्षी प्रथमच निसर्गाचा भयानक अनियमितपणा अनुभवला. भारनियमनामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुधाकररावनाकील, अचलपूर
ओलिताची सोय कुचकामी
माझ्याकडेतीन एकर शेत असून, कपाशीची पेरणी केली आहे. शेतात ओलिताची सोय असूनही भारनियमनामुळे ती कुचकामी ठरली आहे. आठ तासांच्या विजेत सिंचन होऊ शकत नाही. रात्रीच्या विविध धोक्यामुळे सिंचन होऊ शकत नाही. महादेवरावखंडारे, चिंचोली,ता. अंजनगाव सुर्जी