आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुती आणि आघाडीला ‘बसप’चे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आगामीविधानसभा निवडणुकीत जिल्‍हातील आठही मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीच्या उमेदवारांना बहुजन समाज पक्षाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निकालावरुन हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेत बहुजन समाज पक्षाने जिल्‍हातील आठही मतदारसंघांमध्ये मतांचा चांगला वाटा घेतला आहे. मेळघाट वगळता, अन्य सात मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडीच्या उमेदवारांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगाने बदलत असून बसपच्या आव्हानाचा सामना करावा लागणार असल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्‍हात आठही मतदारसंघामध्ये बसपचे उमेदवार आखाड्यात उतरणार असल्याचे यापूर्वीच जाहिर करण्यात आले आहे. आजवरचा अनुभव बघता विधानसभा निवडणुकीत पाच ते दहा हजार मतांच्या फरकाने उमेदवार विजयी होत असल्याचा अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीतही बसपचे सर्वच उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे प्रथम, राष्ट्रवादीच्या नवनीत राणा दुसऱ्या, तर बसपचे गुणवंत देवपारे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
लोकसभा निवडणुकीत पहिल्या तीन पक्षांना प्राप्त मते
पक्ष अमरावती बडनेरा तिवसा अचलपुर दर्यापुर धामणगाव मोर्शी मेळघाट
महायुती ७०२७१९२३६८ ७८९५२ ८४०२२ ८१४६५ ८९८५५ १०० ९८२
आघाडी ५७३७३३४४४७ ४४१६६ ४९१३० ६३६५९ ६४४३४ ४९ १११
बसप १५४७८२८३२७ २१४३८ १०१५६ १४१३६ १७०८३ १२ १७८
मतदारसंघनिहाय फारसा फरक नाही
अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत जिल्‍हातील सात मतदारसंघांमध्ये विजयी, पराभूत उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये दहा ते पंचवीस हजारांचा फरक आहे. मेळघाटमध्ये शिवसेना-भाजप युतीला काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांपेक्षा २१ हजार मते कमी पडली आहेत. मोर्शी मतदारसंघात आघाडीच्या तुलनेत महायुतीच्या उमेदवाराला तब्बल पन्नास हजार मते अधिक पडली आहेत. अमरावती, बडनेरा, तिवसा, मोर्शी, दर्यापूर आणि अचलपूर या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडीपेक्षा अधिक मते मिळाली होती. मेळघाटमध्ये मात्र महायुतीला आघाडीच्या तुलनेत झालेले मतदान कमी होते. बसप, या सर्व ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर होती.