आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Police Commissioner, Sureshkumar Mekala

72 तास पोलिसी ‘वॉच’, पैसे-मद्यवाटपावर पोलिसांची राहील विशेष नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मतदानापूर्वी विशेष पोलिस पथक शहरात अकस्मात तपासणी करणार असून, संवेदनशील, अतिसंवेदनशील आणि संशयास्पद भागात पुढील 72 तासांत पोलिसांची 35 पथके व चार्ली कमांडो विशेष शोधमोहीम राबवणार आहेत. पोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
मतदान शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये, पैसेवाटप, मद्यवाटपासारख्या घटनांवर नियंत्रणासाठी शहरभर आकस्मिक छापे घालण्यात येणार आहेत. लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवस 1350 पोलिस कर्मचारी, अधिकारी तैनात राहणार असून, धडक कृती दल आणि दंगा नियंत्रण पथकेही सतर्क राहणार आहेत. याव्यतिरिक्त सुमारे सातशे पोलिस कर्मचारी जळगाव, मुंबई येथून शहरात डेरेदाखल झाले आहेत.
नमुना परिसर अतिसंवेदनशील
शहरातील नमुना परिसर अतिसंवेदशील घोषित करण्यात आला आहे. या भागात मतदानासाठी तीन बूथ आहेत. विशेष पोलिस पथके आणि चार्ली कमांडोंच्या माध्यमातून हा भाग पोलिसांच्या रडारवर आहे. केंद्रीय पोलिस दलाचे एक विशेष पथक पुढील 72 तास तैनात राहणार आहे.


सुरक्षेकरिता केलेली कारवाई
0 आठ गुंड केले तडीपार
0 कलम 151 नुसार 3 जणांवर कारवाई
0 सीआरपीसी नुसार 50 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
0 512 उपद्रवी व्यक्तींना नोटीस
0 242 शस्त्र केले पोलिसांत जमा
0 अवैध मद्यविक्रीवर 29 छापे; 13 लाखांचा माल जप्त
0 सात कुख्यात गुन्हेगारांना अटक
0 392 गैरजमानती वॉरंट बजावले
0 518 जमानती वॉरंट बजावले
0 शांतता समितीच्या आणि पोलिस मित्रांच्या 47 बैठकी


शहरातील पोलिस यंत्रणा
> पोलिस आयुक्त-1
> पोलिस उपायुक्त-3
> सहायक पोलिस आयुक्त-3
> पोलिस निरीक्षक-18
> पोलिस उपनिरीक्षक-40
> गृहरक्षक दल-412


शहरातील सुरक्षा व्यवस्था
> 260 मतदान केंद्रांवर 335 पोलिसांचा बंदोबस्त
> 636 मतदान बूथवर 373 पोलिस शिपाई
> शहरात 35 ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट
> 68 चार्ली कमांडो तैनात
> रात्री 20 मोबाइल व्हॅनद्वारे होणार निगराणी
> आठ सीमा सुरक्षा केंद्रे