आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवपारे सर्वांत र्शीमंत; 21 कोटींची मालमत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करताना सादर झालेल्या मालमत्तेच्या तपशिलावरून बहुजन समाज पक्षाचे गुणवंत देवपारे हे आतापर्यंतच्या उमेदवारांपैकी सर्वांत र्शीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे 20 कोटी 93 लाख 90 हजार 631 रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला एक दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनीत राणा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. राजेंद्र गवई व बहुजन समाज पक्षाची उमेदवारी मिळालेले गुणवंत देवपारे यांच्यासह एक डझन उमेदवारांनी शुक्रवारी नामांकन दाखल केले.
डॉ. राजेंद्र गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून फेरी काढली. ते बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मनोहर व रामभाऊ पाटील, रिपाइंचे प्रा. भाऊ ढंगारे, अँड. हरिभाऊ ब्राम्हणे, रमेश आठवले आदी कार्यकर्ते त्यांच्यासमवेत होते. गुणवंत देवपारे यांनीही शेवटच्या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होऊन उमेदवारी अर्ज भरला. बसपचे जिल्हाध्यक्ष राजीव बसवनाथे यांच्यासह नगरसेवक दीपक पाटील, माजी नगरसेवक मंगेश मनोहरे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. या दोन दिग्गजांसह नवनीत राणा, मिलिंद लोणपांडे, प्रिया डोंगरे, केशव वानखडे, बंडू साने, किरण कोकाटे, शेषराव वानखडे, ज्योती माकोडे, पवन बोरकर, संजय गव्हाळे (मनसे) या दहाउमेदवारांनीही शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय दिवसभर गजबजले होते.